Indian Railway : भारतीय रेल्वेत पुरुषांबरोबर अनेक महिलाही लोको-पायलट म्हणून काम करतात. कामादरम्यान या महिला कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. एका महिला लोकोपायलटने (Women Loco Pilot) या समस्यांना वाचा फोडली आहे. महिला कर्मचाऱ्यांना आपबीती सांगितली आहे. ट्रेनच्या महिला चालकांना ड्यूटीवर असताना वॉशरुमला (Washroom जायचं असेल तर वॉकी-टॉकीवरुन पुरुष लोको पायलटकडे परवानगी मागावी लागते. ही खूपच शरमेची आणि असुरक्षित बाब असल्याचं महिला कर्मचाऱ्याने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला कर्मचाऱ्याने सांगितली आपबीती
कामादरम्यान महिला कर्मचाऱ्याला वॉशरुमला जायचं असेल तर पुरुष लोको पायलटकडे परवानगी मागावी लागते.  त्यानंतर लोको पायलट स्टेशन मास्टरला (Station Master) सूचित करतो. स्टेशन मास्तर पुढे नियंत्रण विभागाला याची माहिती देतो. नियंत्रण विभागाकडून रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं जातं. ही सर्व बातची डझनभर अधिकाऱ्यांपर्यंत वॉकी-टॉकीच्या माध्यमातून पोहोचते. महिला लोको पायलटला वॉशरुमला जायचं आहे हा संदेश स्टेशनवरही पोहोचवला जातो. म्हणजे एका महिला लोको पायलटला वॉशरुमला जायचं आहे हे जवळपास 10 ते 15 पुरुषांपर्यंत पोहोचलेलं असतं. 


सध्याची ही प्रथा, अनौपचारिकपणे स्वीकारली गेली आहे, जी 'लज्जास्पद आणि महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यासारखी आहे, असं या महिला लोकोपायलटने सांगितलं. 


भारतीय रेल्वेत अनेक महिला
भारतीय रेल्वेत सध्याच्या घडीला जवळपास 1700 हून अधिक महिला ट्रेन चालक असून यापैकी 90 टक्के या लोको पायलटपदी काम करतात. भारतीय रेल्वे किंवा मालगाड्यांमध्ये या महिला पुरुष लोको पायलटला सहाय्यक म्हणून काम करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात महिला लोको पायलटना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं एका महिला लोको पायलटने सांगितलं. प्रवासी रेल्वेत कोणत्याही डब्यात शोचालयात जातं येतं. पण मालगाडी प्रवासात लोको पायलटला एखाद्या स्टेशनवर गाडी थांबवून उतरावं लागतं. 


ट्रेनमधून एखाद्या स्टेशनवर वॉशरुमला जाण्यासाठी उतरल्यावर अनेक पुरुष अधिकारी, ज्यांना वॉकी-टॉकीच्या माध्यमातून माहिती मिळालेली असते ते अधिकारी त्या महिलाकंडे वेगळ्या नजरेने पाहताता. हे खूपच लाजीरवाणं असल्याचं या महिला कर्मचाऱ्याने सांगितलं. विशेषत: रात्रीच्यावेळी एकाद्या सुमसाम स्टेशनवर शौचालयाला जाण्यासाठी उतरणं खूपच असुरक्षित असल्याचंही महिला लोकोपायलटचं म्हणणं आहे. 


महिला कर्मचारी पाणीही पीत नाहीत
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमनचे सहाय्यक महासचिव अशोक वर्मा यांनी दिलेली माहिती तर आणखी धक्कादायक आहे. गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेत विविध पदावर अनेक महिला कर्मचारी नियुक्त झाल्या आहेत. यापैकी मालगडीवर लोकोपायलट असलेल्या महिला कर्मचारी ड्यूटी सुरु होण्याआधी पाणी देखील पीत नाहीत. किंवा ड्यूटीवर असताना कोणतंही लिक्विड घेत नाही. कारण वॉशरुमला जावं लागेत. पण असं करणं त्यांच्या आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण देत असल्याचं अशोक वर्मा यांनी म्हटलंय.