मुंबई : Indian Railways Online Ticket Booking : भारतीय रेल्वेने आता तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता तुम्ही पूर्वीपेक्षा कमी वेळेत तिकीट बुक करू शकाल. रेल्वेच्या निर्णयानुसार आता तिकीट बुकिंगच्या वेळी पत्ता द्यावा लागणार नाही. रेल्वे मंत्रालयाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेने कोरोना विषाणूच्या साथीमुळे, IRCTC वेबसाइट आणि अॅपवर तिकीट बुक करणाऱ्यांना गंतव्य स्थानाचा पत्ता प्रविष्ट करणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु कोविड-19 संसर्गात घट झाल्याने IRCTC ला गंतव्यस्थानाचा पत्ता देणं गरजेचं नाही. रेल्वे मंत्रालयाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.


तिकीट बुकिंगला लागणारा वेळा कमी होणार


रेल्वे मंत्रालयाचा हा नियम मागे घेतल्याने तिकीट बुकिंग दरम्यान लागणारा वेळही कमी होणार आहे. हे आदेश सर्व रेल्वे झोनला देण्यात आले आहेत. IRCTC लाही आदेशानुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील.


कोरोना काळात विविध ट्रेनच्या प्रवाशांना झोपण्यासाठी उशा आणि ब्लँकेट देणं बंद केलं होतं. आता विविध गाड्यांमधील प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी उशा आणि ब्लँकेट दिले जात आहेत.