नवी दिल्ली : Coronavirus कोरोनाचा वाढता विळखा पाहता देशभरात काही दिवसांपासून लॉकडाऊऩची परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन अवघ्या काही दिवसांनी संपणार आहे. त्याच धर्तीवर लॉकडाऊनच्या या कालावधीनंतर म्हणजेच १५ एप्रिलपासून भारतीय रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत सुरु होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे सुविधांविषयी होणाऱ्या या चर्चा पाहता गुरुवारी भारतीय रेल्वे विभागाकडूनच याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती स्पष्च करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी १५ एप्रिलपासून रेल्वेसेवा पूर्ववत होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शिवाय प्रवाशांना नव्या प्रवासी नियमांचं पालन करलवं लागणार असल्याचं वृत्तही फेटाळण्यात आलं आहे. 


रेल्वे सेवा सुरु होणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहून अखेर भारतीय रेल्वे विभागाकडून याविषयीचं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं. प्रवाशांनी अपेक्षित रेल्वेने प्रवास करण्यासाठी वेळेच्या अमुक इतके तास आधील रेल्वे स्थानकांवर पोहोचावं, शिवाय प्रवाशांना यादरम्यान थर्मल स्क्रीनिंगचा टप्पाही पार करावा लागणार आहे, अशा बऱ्याच अफवांनी जोर धरला होता. 


 


हे पाहता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून असे कोणत्याही प्रकारचे निर्देश न दिल्याचं सांगण्यात आलं. प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असं आवाहनही करण्यात आलं. पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व रेल्वेची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीशी दोन हात करताना फक्त आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी पार्सल रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात आली आहे.