मुंबई : भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या महिन्यापासून मोस्ट अवेटेड कंटेंट ऑन डिमांड  (COD) सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत रेल्वेने विविध भाषांमध्ये चित्रपट, बातम्या, संगीत व्हिडिओ इत्यादी अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. (Indian Railways : content on demand service in trains to be launched this month said railtel officials)


प्रवासात बफर-मुक्त आनंद लुटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेलटेलचे (RailTel) सीएमडी पुनीत चावला म्हणाले की, बफर-फ्री सर्व्हिस लक्षात घेऊन रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर बसविला जाईल. त्यामुळे वेळोवेळी कंटेंट सामग्री अद्यावत राहिल आणि प्रवासी बफर-मुक्त प्रवाहाचा आनंद घेण्यास सक्षम असतील. 5,723 लोकलसहीत 5,952 ट्रेन  आणि 8,731 पेक्षा जास्त स्थानकांसह गाड्यांमधून ही सेवा सुरू केली जाणार आहे.


60 कोटी रुपये महसूल अपेक्षित 


चावला म्हणाले की, पश्चिम रेल्वेमधील पथदर्शी प्रकल्प आणि रेल्वेगाडीवरील एसी लोकलचे काम पूर्णत्वास येत आहे. त्याची चाचणी केली जात आहे, जी शेवटच्या टप्प्यात आहे. यात रेल्वे आणि रेलटेलचा महसूल हिस्सा 50:50 असेल. पीएसयूला या प्रकल्पातून किमान 60 कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.