मुंबई : Indian Railways: रेल्वेमध्ये (Train) आग लागण्याच्या घटना बर्‍याच वेळा पाहिल्या गेल्या आहेत. अलिकडेच नवी दिल्ली-ढेहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या (Delhi-Dehradun Shatabdi Express) डब्यात आग लागली. त्याचबरोबर गाझियाबाद स्थानकातही आगीच्या अनेक घटना घडल्या. या घटना पाहता रेल्वेने प्रवाश्यांसाठी अधिकृत अधिसूचना (Official Notification) जारी केली आहे.


रेल्वेने ट्विट करत म्हटले आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांनी प्रवास करताना ज्वलनशील साहित्य वाहू देऊ नये, तसेच दुसऱ्यालाही असे करण्यापासून रोखावे.  (Indian Railways Ban Flammable Goods) रेल्वे प्रवासादरम्यान, ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे, हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्याने कायदेशीर कारवाई तसेच जेल होऊ शकते. पश्चिम मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वे अधिनियम 1989च्या कलम 164 नुसार आग फैलावणे किंवा ट्रेनमध्ये ज्वलनशील वस्तू ठेवणे हा गुन्हा आहे, त्यास तीन वर्षांच्या जेलची शिक्षा किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो. एक हजार रुपयांपर्यंत किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.



या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे


रेल्वेच्या ट्विटनुसार रेल्वेच्या डब्यात रॉकेल, कोरडे गवत, स्टोव्ह, पेट्रोल, रॉकेल, गॅस सिलिंडर, इंधन, माचिस, फटाके किंवा इतर कोणत्याही ज्वलनशील वस्तूंसह प्रवास करु नये. रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी हा नियम बनविला आहे. जेणेकरून रेल्वेमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप प्रवास करू शकतील आणि त्यांचा प्रवास आनंदी होईल.


रेल्वे परिसरात धूम्रपान करणे हा गुन्हा 


इतकेच नाही तर रेल्वेने आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या योजनेनुसार जर कोणी ट्रेनमध्ये धूम्रपान करताना पकडला गेला तर त्याला जेलमध्ये जाऊ शकते. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो. रेल्वेच्या आवारात सिगारेट, बिडी धूम्रपान करणेदेखील दंडनीय गुन्हा आहे. असे करताना आढळलेल्या प्रवाशांना 200 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.