Indian Railways: देशात दररोज कोट्यवधी नागरिक ट्रेनने प्रवास करतात. दूरच्या प्रवासासाठी ट्रेनचा प्रवास सुरक्षित आणि परवडणारा मानला जातो. दुरच्या प्रवासात प्रवाशांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून रेल्वेत कॅन्टीनची सुविधा असते. पण अनेकदा कॅन्टीनटी सुविधा चांगली मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करतात. अशीच एक घटना समोर आलीय, ज्यामध्ये 5 रुपये जास्त आकारल्याने कॅन्टीन मालकाला 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कुठे, कसा घडला हा प्रकार? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये एक व्लॉगर रेल्वे प्रवासादरम्यान व्हिडीओ बनवतोय. 
हा तरुण ट्रेनच्या थर्ड एसी इकॉनॉमीमध्ये आहे. ज्यात तो पाण्याची बॉटल विकत घेतोय. ही पाण्याची बॉटल त्याला 20 रुपयांना विकत दिली जातेय. पाण्याची बॉटल इतकी महाग आहे का? असा प्रश्न तो पाणी विकणाऱ्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला विचारतो. यावर कॅन्टीन कर्मचारी 5 रुपये तर आम्हाला मिळतात,असे बोलताना दिसतोय. हे सर्व सुरु असताना प्रवासी व्हिडीओ रेकॉर्ड करत असतो. 


पाहा व्हिडीओ


 



प्रवाशाने 139 नंबरवर यासंदर्भात तक्रार दाखल केली. घडलेला सर्व प्रकार त्याने तक्रारीत मांडला. यानंतर थोड्याच वेळात टीसी तिथे पोहोचतो आणि ज्या प्रवाशांकडून जास्त पैसे आकारले त्यांना ते परत देण्यास सांगितले जातात.  


रेल्वे प्रशासनाकडून कॅन्टीन चालकाला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या व्हिडीओमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.