नवी दिल्ली : Indian Railways Rule: तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी, तुमच्याकडे बर्थ निवडीचा पर्याय असतो. पण प्रत्येक वेळी मनाप्रमाणे सीट मिळत नाही. कारण भारतीय रेल्वेमध्येही मर्यादित जागा आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने बर्थबाबत कडक नियम केले आहेत. प्रवास करण्यापूर्वी, या नियमांची जाणीव असणे आणि त्यांचे पालन करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.


Railwaysचा मधला बर्थ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासादरम्यान मिडल बर्थ (Middle berth) मिळाल्यास अनेकवेळा समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तविक, खालच्या बर्थचे प्रवासी अनेकदा रात्री उशिरापर्यंत बसतात. अशा परिस्थितीत मधल्या बर्थच्या प्रवाशाला रेल्वेचे नियम माहित असणे आवश्यक आहे. मिडल बर्थसाठी रेल्वेचा नियम वेगळा आहे. रेल्वेच्या नियमांचा खूप उपयोग होतो, त्याची जाणीव ठेवल्यास तुमचा प्रवास सुखकर होईल. जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर तुमची अडचण होऊ शकते.


मधल्या बर्थचा नियम


रेल्वे सुरु होताच मधल्या बर्थवर झोपण्यासाठी काहीवेळा बर्थ उघडतात. त्यामुळे लोअर बर्थ असलेल्या प्रवाशांना खूप त्रास होतो. पण रेल्वेच्या नियमांनुसार, मधला बर्थ असलेला प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच त्याच्या बर्थवर झोपू शकतो. म्हणजेच रात्री 10 च्या आधी. जर एखाद्या प्रवाशाला मधला बर्थ उघडणे थांबवायचे असेल तर तुम्ही त्याला थांबवू शकता. त्याचवेळी, सकाळी 6 नंतर बर्थ खाली करावा लागेल जेणेकरुन इतर प्रवाशांना खालच्या बर्थवर बसता येईल.


काहीवेळा खालच्या बर्थवरील प्रवासी रात्री उशिरापर्यंत जागा राहतो. त्यामुळे मधल्या बर्थच्या प्रवाशाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही नियमानुसार 10 वाजता तुमची सीट घेऊ शकता. 


 रात्री 10 नंतर तिकीट तपासणी नाही 


तुमच्या प्रवासादरम्यान, ट्रॅव्हल तिकीट परीक्षक (TTE) तुमच्याकडून तिकीट तपसण्यासाठी येतो. कधीकधी तो तुम्हाला उशिरा उठवतो आणि तुमचा ओळखपत्र दाखवायला सांगतो. पण, तुम्हाला आता TTE देखील तुम्हाला रात्री 10 नंतर त्रास देऊ शकत नाही. टीटीईला सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच तिकिटांची तपासणी करणे आवश्यक आहे. रात्री झोपल्यानंतर कोणत्याही प्रवाशाला त्रास होईल असे तो करु शकत नाही. ही मार्गदर्शक सूचना रेल्वे बोर्डाची आहे. मात्र, रात्री 10नंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही.