Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. कैक वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या रेल्वेची अनेक रुपं आजवर अनेकांनी पाहिली. असंख्य प्रवाशांनी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास केला. जवळच्या ठिकाणापासून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रत्येकाचीच पसंती या रेल्वेला मिळताना दिसली. अशा या रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं अनेक निर्णय घेतले जातात. अताच एक निर्णय रेल्वेनं पुन्हा एकदा घेतला असून, प्रवाशांचा रेल्वे तिकीट काढतानाच त्रास यामुळं कमी होणार आहे. 


काय आहे रेल्वे विभागाची योजना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकीट काढताना निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे विभाग विकल्प (VIKALP) नावाची योजना राबवताना दिसत आहे. या उपक्रमामुळं प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची दाट शक्यता असते. तिकीट बुक करत असतानाच रेल्वेकडून हा पर्याय तुम्हाला दिला जातो. राहिला मुद्दा तुम्ही या योजनेचा फायदा कसा घ्याल याबाबतचा तर तेसुद्धा जाणून घ्या. 


2015 पासूनच रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या हितार्थ विकल्प योदना सुरु करण्यात आली. अल्टरनेट ट्रेन एकोमोडेशन स्कीम (ATAS) ला रेल्वेकडून विकल्प हे नाव देण्यात आलं. या योजनेअंतर्गत तिकीट बुक करत असताना प्रवाशांना ऑनलाइन वेटिंग तिकीट बुक करत असतानाच कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी इतर रेल्वेंचा पर्याय अर्थात विकल्प निवडण्याची मुभा देतं. 


हेसुद्धा वाचा : रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ 


हा पर्याय निवडलं असता तुम्हाला Confirm Ticket मिळण्याची शक्यता वाढते. तिकीट बुक करतेवेळीच तुम्हाला VIKALP पर्याय दिला जाईल. इथं तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळालं आहे, त्याचवेळी तुम्हाला त्याच मार्गावरून जाणाऱ्या इतर ट्रेनचे पर्यायही निवडण्यास सांगितलं जातं. ऑनलाईन तिकीट बुक करताना तुम्हाला हा पर्याय वापरता येतो. यावेळी कोणत्याही ट्रेनमध्ये कोणतीही जागा रिक्त असल्यास किंवा बर्थ उपलब्ध असल्यास तुम्हाला ती निवडता येते आणि कन्फर्म सीट मिळून जाते. 


रेल्वेच्या या विकल्प योजनेअंतर्गत तुम्हाला 7 रेल्वेंमधून पर्याय निवडता येऊ शकतो. या रेल्वेगाड्या प्रवास सुरु करण्याच्या स्थानकापासून गंतव्यापर्यंत 30 मिनिटं ते 72 तासांदरम्यानच्या वेळेत धावणाऱ्या हव्यात. रेल्वेकडून तिकीटासाठीचा हा एक पर्याय असला तरीही VIKALP मधून 100 टक्के कन्फर्म तिकीट मिळेलच याची मात्र हमी नाही.