IRCTC करणार धावत्या ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा.... या ट्रेनचे तिकिट बुक करा आणि गिफ्ट्स मिळवा
ही ट्रेन आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी विविध ऑफर आणत असते.
मुंबई : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तेजस एक्सप्रेसने रेल्वे प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आता तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा करू शकता. खरेतर तेजसचे प्रवासी लकी ड्रॉद्वारे बक्षिसे जिंकू शकतात आणि यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. आपण तिकीट खरेदी करताच बक्षिसे जिंकण्याची शक्यता वाढते. IRCTC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर तेजस एक्सप्रेसच्या या ऑफरची माहिती दिली आहे.
प्रवासासह आकर्षक भेटवस्तू
तेजस एक्सप्रेसने प्रवाशांसाठी लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे. या अंतर्गत 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत एक उत्तम भेट उपलब्ध असेल. तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे. जी IRCTC द्वारे चालवली जाते. ही ट्रेन आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी विविध ऑफर आणत असते.
IRCTC ने या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अशीही व्यवस्था केली आहे की, प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल, तर ते तेजस एक्सप्रेस कर्मचाऱ्यांना माहिती देऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या केकची व्यवस्था केली जाऊ शकते.
लकी ड्रॉ योजनेमध्ये बक्षीस विजेत्या प्रवाशांची निवड करण्याचा एक विशेष मार्ग आहे. दररोज 13 प्रवाशांना तेजस एक्सप्रेसकडून भेट दिली जात आहे. 27 ऑगस्ट रोजी जेव्हा ते पहिल्यांदा सुरू झाले, तेव्हा काही प्रवाशांना सरप्राईज गिफ्ट मिळाल्याने आश्चर्य वाटले. कंप्यूटर चेयर बोगीत प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांना आणि एग्जीक्यूटिव वर्गात प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांना भेटवस्तू वितरित केल्या जात आहेत. ही प्रक्रिया 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
या प्रकारे लकी ड्रॉच्या विजेत्याचे नाव निश्चित
लखनौ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांच्या पीएनआर क्रमांकाच्या आधारावर भेट देण्यात येत आहे. ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांपैकी, IRCTC ची IT टीम लकी ड्रॉमध्ये एका दिवशी 13 लोकांची नावे उघडेल. त्यानंतर त्या लोकांना रेल्वेकडून भेट दिली जाईल.
आधुनिक सुविधांच्या दृष्टीने तेजस एक्सप्रेस इतर गाड्यांपेक्षा खूप वेगळी आहे. हेच कारण आहे की, त्यांचे भाडे देखील खूप जास्त आहे. यामुळे ते ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षीत करण्यासाठी या सुविधा पुरवत आहेत.