नवी दिल्ली :  Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रवासादरम्यान उपवास करणाऱ्या लोकांना विशेष सुविधा देत आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने  (IRCTC) प्रवासादरम्यान लोकांना नवरात्रीचे खास उपवासाचे खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमचे आवडते उपवासाचे खाद्यपदार्थ सीटवरच ऑर्डर करू शकता.


IRCTCची सुविधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IRCTC नुसार, 2 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवादरम्यान अनेक प्रवाशांचे उपवास असू शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना उपवासाचे खाद्य म्हणजेच फळे दिली जातील. प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार ई-कॅटरिंगद्वारे किंवा 1323 जागांवर बुकिंग करून त्यांचे आवडते खाद्यपदार्थ मिळू शकतील. उपलब्घ पदार्थ लसूण-कांद्याशिवाय बनवलेले असतील. हे अन्न शुद्ध आणि सात्विक असेल. एवढेच नाही तर उपवासानुसार स्वयंपाकात सैंधव मिठाचा वापर केला जाणार आहे.


जेवणात काय मिळेल?


IRCTCने लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मेन्यू तयार केला आहे. या अंतर्गत चार वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स मिळतील. त्यांची किंमत फक्त 125 ते 200 रुपये असू शकते. ही सुविधा जवळपास 500 ट्रेनमध्ये उपलब्ध असेल. हे पदार्थ फक्त ट्रेनमध्ये उपलब्ध असेल आणि स्थानकांवर IRCTC स्टॉलवर उपलब्ध नसेल.


हा मेन्यू असण्याची शक्यता


- पुरी भाजी
- साबुदाणा खिचडी
- लस्सी
- ताजा रस ( मीठ, साखर नसेल)
- फळे, चहा, रबरी,
- ड्रायफूड्सची खीर