Indian Railways: तुम्ही होळीनिमित्ताने आपल्या गावी ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने तात्काळ एसी गाड्यांमध्ये बेडरोल (Bedroll in Trains) उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत, मात्र तरीही प्रवाशांना ट्रेनमध्ये ही सुविधा मिळत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक रेल्वेने गावाकडे जात असतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास केला असेल तर सोबत चादर, उशी ठेवायला विसरू नका. ज्यांच्याकडे एसी तिकीट आहे, त्यांनी खासकरून बेड किट सोबत न्यावं. कारण रेल्वेने प्रवासात बेडरोल देण्याची घोषणा केल्यानंतरही ही सुविधा प्रवाशांना मिळत नाहीए.


तांत्रिक कारणाने अडचण
बेडरोलमध्ये प्रवाशांना चादरी, उशा आणि ब्लँकेट दिले जातात. मात्र कोरोना संसर्गामुळे बेडरोल सुविधा बंद करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रवाशांना स्वत:ची उशी, चादर घेऊन प्रवास करावा लागत होता. 


खासगी कंपन्या ट्रेनमध्ये बेडरोलची सुविधा देतात. त्यासाठी रेल्वेकडून निविदा काढल्या जातात. पण, लॉकडाऊनच्या काळात गाड्यांमधील बेडरोल बंद करण्यात आल्याने खासगी कंपन्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. ही सुविधा जवळपास दोन वर्षे गाड्यांमध्ये बंद होती. 


आता पुन्हा रेल्वेकडून बेडरोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना चादर, ब्लँकेट, उशा या सुविधा मिळणार नाहीत.


रेल्वे स्थानकांवर डिस्पोजेबल बेडरोल
प्रवाशांना लवकरात लवकर बेडरोल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे.  रेल्वेने डिस्पोजेबल पेड बेडरोलची सुविधा सुरू केली होती, जी प्रवासादरम्यान प्रवासी स्थानकावरून खरेदी करता येते. पण, मोठ्या कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना हे महागात ठरू शकतं.