मुंबई : Indian Railway अनेकदा असं होतं की, रेल्वेचं रिजर्वेशन करतो मात्र अचानक आपला प्लान बदलतो. अशावेळी आपण तिकिट रद्द करण्याचा प्लान करतो. यामध्ये तुमचे काही पैसे कट होतात. मात्र आता रेल्वेने नियम बदलले आहेत. यामुळे तुमच्याकडे आता दुसरा पर्याय असणार आहे. आता तुम्ही तुमचा ट्रेन प्रवास Preponed किंवा Postponed देखील करू शकता. एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या प्रवासाचं ठिकाण देखील बदलू शकता. 


कशी बदलाल तारीख?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासी बोर्डिंग स्टेशन मॅनेजरला एक ऍप्लिकेशन देऊन किंवा ट्रेन सुटण्याच्या अगोदर जवळपास 24 तास अगोदर कोणत्या कम्प्युटराइज्ड रिजर्वेशन सेंटरवर जाऊन प्रवासाच ठिकाण बदलू शकतात. ही सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाइन असा दोन्ही पद्धतीने बुक केलेल्या तिकिटांवर आहे. 


प्रवासाचं ठिकाण देखील बदलू शकता


जर तुमचा प्रवास पुढच्या स्टेशनपर्यंत वाढणार आहे. किंवा त्यांचं ठिकाण बदलणार असेल तर तुम्ही तसा बदल तिकिटातही करू शकता. तिकिट बुकिंग केलेल्या स्टेशनचा पुढचा प्रवास करायचा असेल. तर तुम्ही तिकिटावरील आपल्या प्रवासाचं ठिकाण बदलू शकाल. प्रवास करण्याआधी तिकिट चेकिंग स्टाफला याबाबत माहिती द्यायची आहे. तुम्हाला नव्या स्टेशनची माहिती द्यायची आहे. 


फक्त एकदाच बदलू शकता प्रवासाची तारीख 


Indian Railway च्या वेबसाइटनुसार, स्टेशन काऊंटर बुकिंग केलेल्या तिकिटाची तारीख 'Preponed' या 'Postponed' फक्त एकदाच केलं जाऊ शकतं. यामध्ये तुमचं तिकिट कन्फर्म असो वा RAC किंवा वेटिंग. कोणत्याही प्रकारच्या तिकिटाला हा पर्याय उपलब्ध आहे. प्रवासाची तारीख बदलण्याकरता अगोदर प्रवाशाला रिझर्वेशन ऑफिस जाऊन ट्रेन सुटण्याच्या 48 का अगोदर आपलं तिकिट सरेंडर करावं लागेल. ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांकरताच आहे. ऑनलाइन तिकिटांकरता ही सुविधा नाही. 


ट्रेन प्रवासाची तारीख अशी बदला 


भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. आपल्या कन्फर्म/RAC/वेटिंग तिकिटावरील प्रवासाची तारीख बदलू शकतात. भारतीय रेल्वेनुसार, प्रवासाची तारीख तसेच श्रेणी देखील आपण 'Preponed' किंवा 'Postponed'करू शकता.