मुंबई : भारतीय रेल्वेकडून ट्रेनमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रेल्वे बदलत असलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रवाशांना रात्री झोपताना होणारा त्रास लक्षात घेऊन रेल्वेने काही नियम केले आहेत. यानंतर रात्री प्रवाशांच्या झोपेचा त्रास होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन नियम तात्काळ लागू 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, आता तुमच्या आजूबाजूचा कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर मोठ्याने बोलू शकणार नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वे अशा लोकांवर कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी
नव्या नियमांतर्गत अशीही तरतूद आहे की, ट्रेनमधील प्रवाशाकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सर्व झोनला आदेश जारी करून हे नियम तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


प्रवाशांनी केल्या तक्रारी
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर उपस्थित असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची किंवा गाणी ऐकत असल्याची तक्रार करत असत. याशिवाय रात्रीच्या वेळी काही मंडळी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी होत्या. रेल्वेचे स्कॉट किंवा मेंटेनन्स कर्मचारी गस्तीदरम्यान मोठ्या आवाजात बोलतात त्याबाबतही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची पुरेशी झोप होत नव्हती. रात्रीच्या वेळी दिवे लावण्यावरूनही अनेकदा वाद होत होते.


रात्री 10 वाजताची ही मार्गदर्शक तत्त्वे


  • कोणताही प्रवासी मोठ्याने बोलणार नाही किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणार नाही.

  • रात्रीच्या वेळी सहप्रवाशाला झोपेचा त्रास होऊ नये म्हणून रात्रीचे दिवे सोडून इतर सर्व दिवे बंद करावे .

  • गटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत ट्रेनमध्ये मोठ्याने गप्पा मारता येणार नाही. सहप्रवाशाच्या तक्रारीवरून कारवाई होऊ शकते.

  • चेकिंग कर्मचारी, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग कर्मचारी आणि देखभाल कर्मचाऱ्यांनी रात्री शांततेने काम करावे.

  • रेल्वे कर्मचारी वृद्ध, दिव्यांग आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिलांना तात्काळ मदत करतील.