Indian Railways : तुमच्या रेल्वे तिकिटावर कोणी `दुसरी व्यक्ती` देखील प्रवास करु शकते ! रेल्वेचा हा नियम जाणून घ्या
Indian Railways: तुम्हाला माहित आहे का? तुमच्या आरक्षित तिकिटावर (Confirm Ticket) अन्य दुसरी व्यक्त प्रवास करु शकते. भारतीय रेल्वे प्रवाशांना त्यांचे तिकीट दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. या सुविधेबद्दल अधिक जाणून घ्या.
मुंबई : Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. जर तुमच्याकडे कन्फर्म ट्रेन अर्थात आरक्षण तिकीट (Confirm Ticket) असेल, पण तुम्ही इतर काही महत्त्वाच्या कामामुळे प्रवास करु शकत नसाल, तर तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला ट्रान्सफर (Railway Ticket Transfer) करु शकता. किंवा तुम्ही ही तिकिटे कोणत्याही गरजूला देऊ शकता. या सुविधेबद्दल माहिती जाणून घ्या.
रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सुविधा
तुम्ही रेल्वेचे तिकीट काढता, मात्र आयत्यावेळी तुमचे काहीतरी काम निघते. त्यामुळे तुम्हाला रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत एकतर त्यांना तिकीट रद्द करावे लागते आणि त्यांच्या जागी पाठवलेल्या व्यक्तीचे नवीन तिकीट घ्यावे लागते. पण त्यानंतर कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते. त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. जरी ही सुविधा बऱ्याच काळापासून सुरु आहे, परंतु लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांना ट्रान्सफर करु शकता
तुमचे आरक्षण केलेले तिकीट प्रवास रद्द झाला तर ती व्यक्ती कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करु शकतो. यासाठी प्रवाशाला रेल्वे सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करावी लागेल. यानंतर, तिकिटावर प्रवाशाचे नाव कमी करुन ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले गेले आहे त्याचे नाव टाकले जाते.
अर्ज 24 तास अगोदर द्यावा लागेल
जर प्रवासी सरकारी कर्मचारी असेल आणि त्याच्या ड्युटीसाठी जात असेल तर तो रेल्वे सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करु शकतो, ज्या व्यक्तीसाठी विनंती केली आहे त्याच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर केले जाईल. लग्नाला जाणाऱ्या लोकांसमोर अशी परिस्थिती आल्यास लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास आधी अर्ज करावा लागतो. ही सुविधा तुम्ही ऑनलाइनही मिळवू शकता. ही सुविधा एनसीसी कॅडेट्ससाठीही उपलब्ध आहे.
फक्त एकदा संधी मिळवा
भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की तिकिटांचे हस्तांतरण फक्त एकदाच केले जाऊ शकते, म्हणजे, जर प्रवाशाने त्याचे तिकीट दुसर्या व्यक्तीला एकदा हस्तांतरित केले असेल तर तो ते बदलू शकत नाही, म्हणजेच आता हे तिकीट इतर कोणालाही हस्तांतरित केले जाऊ शकत नाही.
तुम्ही तुमचे तिकीट दुसऱ्याला कसे हस्तांतरित करु शकता
रेल्वेचे तिकीट कसे ट्रान्सफर करावे? (Railway Ticket Transfer)
1. तिकिटाची प्रिंट काढा.
2. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरला भेट द्या.
3. ज्यांच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचे आहे, त्याचा ओळखपत्र जसे की आधार किंवा मतदान ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
4. काउंटरवर तिकीट हस्तांतरणासाठी (Railway Ticket Transfer) अर्ज करा.