इस्रोने रचला इतिहास, १००व्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या उपग्रहात PSLV C 40 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं कार्टोसॅट २ उपग्रह अवकाशात झेपावलं. या उपग्रहात देश-विदेशातले अन्य ३१ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले आहेत.
हवामान निरीक्षण
हवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला १०० वा उपग्रह आहे.
या देशांचे उपग्रह
इस्रोकडून लॉन्च करण्यात आलेल्या पीएसएलव्ही सी-४० रॉकेटच्या माध्यमातून ३१ सॅटेलाईट्समध्ये २८ विदेशी आणि ३ स्वदेशी उपग्रह आहेत. या ३१ सॅटेलाईट लॉन्चिंगच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी २ तास २१ मिनिटांचा वेळ लागला. कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या उपग्रहांसह भारताचा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडण्यात आले आहेत. या ३१ उपग्रहांचं एकूण वजन १ हजार ३२३ किलो आहे.