Indian Woman Jugaad: अशीच पत्नी हवी... एका जुगाडने वाचवले नवऱ्याचे 20-25 हजार! फोटो झाले Viral
Indian Woman Clever Jugaad Wins Heart: पतीने पत्नीकडे यासंदर्भातील कल्पना शेअर करताना आपला प्लॅन काय आहे आणि किती खर्च येईल याबद्दल सांगितलं होतं. मात्र पत्नीने पतीची गरज लक्षात घेऊन घरगुती जुगाड करुन पतीला आश्चर्याचा धक्का दिला.
Indian Woman Jugaad Projector Screen: पती-पत्नीचं नातं हे कायमच चर्चेचा विषय असतं. कधी दोघांमध्ये झालेल्या वादामुळे तर कधी दोघेही विनोदाचा विषय ठरतात त्यामुळे. अनेकदा पती-पत्नीसंदर्भातील विनोद हे इंटरनेटवर लोकांचं लक्ष वेधून घेतात. या विनोदांमध्ये कधी पत्नीची खिल्ली उडवली जाते तर कधी पतीची. पत्नीची खिल्ली उडवताना तिची बुद्धी आणि वागण्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं जातं. तर नवऱ्यांवरील विनोदांमध्ये पत्नी किती स्मार्ट आहे हे दाखवलं जातं. मात्र इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये एका स्मार्ट भारतीय पत्नीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या फोटोला 250 हून अधिक रिट्विट्स आणि 7 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. पण असं या पत्नीने नेमकं केलंय काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घेऊयात...
खर्च येणार होता 20 ते 25 हजार
नेटकरी या स्मार्ट पत्नीने केलेला जुगाड पाहून तिच्या डोकॅलिटीचे चाहते झाले आहेत. या महिलेच्या पतीने घरामध्ये एक रोलेबल मोटराइज्ड प्रोजेक्टर लावण्यासंदर्भातील कल्पना मांडली. सर्वांना आरामात आणि मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने रंजीत नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीकडे ही कल्पना मांडली. यासाठी तब्बल 20 ते 25 हजारांपर्यंत खर्च येणं अपेक्षित होतं. मात्र हाच नकोसा खर्च वाचवण्यासाठी या पत्नीने एक जुगाड केला जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
फोटो केले शेअर
पत्नीने केलेल्या जुगाडमुळे रंजीत यांचे हजारो रुपये वाटले. या महिलेने एक पांढरी चादर घराच्या हॉलमधील भिंतीवर टांगली आणि त्यासमोर प्रोजेक्टर ठेवला आणि 'हा पाहा काय पहायचं आहे ते' असं म्हटलं. रंजीत यांनी या जुगाड प्रोजेक्टरचे फोटो शेअर केले आहेत.
कॅफ्शन चर्चेत
"जुगाड : मी माझ्या पत्नीला म्हटलं होतं की आपण घरामध्ये एक रोलेबल मोटराइज्ड प्रोजेक्टर स्क्रीन लावू शकतो... याची किंमत जवळपास 20 ते 25 हजार असेल. तिने 4 क्लिप आणि ही बेडशीट बाहेर काढली ती अशापद्धतीने टांगली आणि म्हणाली यावर पाहा," अशा कॅफ्शनसहीत रंजीत यांनी फोटो शेअर केले आहेत.
अनेकांनी केलं कौतुक
19 मार्च रोजी रंजीत यांनी ही पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट आता व्हायरल झाली असून अनेकांना हा देसी जुगाड प्रचंड आवडला आहे. एकाने, "तुमचे 20-25 हजार तिने वाचवले कारण त्या पैशांमधून तुम्ही तिला तिच्या आवडत्या दुकानांमध्ये शॉपिंगला घेऊन जाऊ शकाल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. "नेहमी आपल्या पत्नीचं ऐकावं, असं केल्याने केवळ पैसेच वाचतात असं नाही तर मानसिक शांतीही मिळते," असं निरिक्षण नोंदवलं आहे.