कविता शर्मा, झी मीडिया, नवी दिल्ली :  या जगात खूप काही पाहण्यासारखं आहे... पाहून घ्या... भरभरून जगून घ्या... सध्या मौसम सुट्ट्यांचा आहे... पण तुम्ही तुमच्या ऑफिसमधून सुट्टी घेतलीय का? तुमचा बॉस तुम्हाला सुट्टी देतो का?  हे विचारायची वेळ आलीय... कारण भारतीय कर्मचारी आणि सुट्ट्या या संदर्भातलं एक सर्वेक्षण समोर आलंय. नुकत्याच एका जागतिक सर्वेक्षणानुसार ६५ टक्के भारतीय कर्मचारी सुट्टीच घेत नसल्याचं समोर आलंय... भारतात परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात आणि धमाल करतात... पण  त्या तुलनेनं भारतीय नागरिकांचं परदेशी पर्यटन बरंच कमी आहे... सुट्टी न घेणाऱ्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Expedia Vacation Deprivation च्या अहवालानुसार भारतातले ६५ टक्के कर्मचारी वर्षभरातल्या ठराविक सुट्ट्या घेतच नाहीत. 


- ४० टक्के लोकांना त्यांचं ऑफिस कर्मचारी कमी असल्याचं सांगत सुट्टी देत नाही


- तर ३० टक्के भारतीयांमध्ये सुट्टी मागायची हिंमतच नसते


- तर १६ टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी घेऊन करायचं काय, हेच समजत नाही



सुट्टी का घ्यायची नाही, याचीही प्रत्येकाची काही कारणं असतात 


- त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असुरक्षितता


- आपल्या गैरहजेरीत आपलं स्थान दुसरं कोणीतरी घेईल, अशी सतत भीती त्यांना असते


- तर आपल्या गैरहजेरीत आपल्याविरोधात कुणीतरी बॉसकडे चुगली करेल, अशीही भीती असते


- आपण नसताना ऑफिसमध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय झाला, तर काय, अशीही भीती बहुतांश कर्मचाऱ्यांना वाटतं 


मुळात सतत काम केल्यानं तुमचा मेंदू कमी गतीनं काम करतो. निद्रानाश, सकाळी डोकं दुखणं अशा समस्या सुरू होतात.. त्याऐवजी काही महिने सलग काम केल्यानंतर एक मोठी सुट्टी घ्यायलाच हवी... त्यामुळे नव्या उर्जेसह तुम्ही आणखी दुप्पट काम करायला सज्ज होता.


ऑफिसच्या कामात बिझी असाल तरी थोडा वेळ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबीयांसाठी काढा... एक मोठी सुट्टी नक्की घ्या... बॅगा भरा... आणि फिरायला जा... मनसोक्त मजा करा... खूप काही पाहून घ्या... भरभरुन जगून घ्या...  एक ब्रेक तो बनता है यार...