मुंबई : हॉलिडेसाठी परदेशी जाणाऱ्या भारतीयांमध्ये युरोप हे आजही सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. परंतु, अगोदरच्या वर्षापेक्षा वेगळे चित्र दिसत असून, प्रवासाच्या आवडीनिवडीमध्ये काहीसा फरक झाला आहे. हॉलिडेनिमित्त दोन देशांत किंवा तीन देशांत, म्हणजे सात रात्री किंवा आठ रात्री अशा कालावधीसाठी जाणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळजवळ 50 टक्के वाढले असल्याचे निरीक्षण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, भारतीय पर्यटक आता वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा हॉलिडेचा बेत आखतात व त्यांना त्यानुसार सुटीचे नियोजन करायचे असते. म्हणजेच, हॉलिडेचे नियोजन केल्यावर कोणतेही लोकप्रिय ठिकाण न चुकवता भारतीय पर्यटकांना आता प्रवासाचा अप्रतिम अनुभव अपेक्षित असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा उन्हाळ्यात पर्यटकांची सर्वाधिक पसंती फ्रान्स व स्वित्झर्लंड या दोन युरोपीय देशांना आहे. काही पर्यटक या देशांबरोबरच ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी किंवा नेदरलँड्स अशा एखाद्या देशाचाही समावेश करतात. फ्रान्स-स्वित्झर्लंड या व्यतिरिक्त, भारतीय पर्यटकांना यंदा युनायटेड किंग्डम-स्कॉटलंड आणि स्पेन-पोर्तुगाल हे दोन-दोन देशांचे पर्यायही पसंत पडत आहेत. आइसलँड, युक्रेन, ग्रीस व क्रोएशिया अशी ठिकाणे सहसा एकेकटी समाविष्ट केली जातात. 


लोकप्रिय साइटसीइंगव्यतिरिक्त, पर्यटकांना इतरही अविस्मरणीय अनुभव घ्यायचे आहेत, जसे रिव्हर सिन क्रुजमधून पॅरिस शहर पाहणे, कॅनलमधून अम्स्टरडॅम पाहणे, बाहन्होस्ट्रास – झ्युरिकमधील शॉपिंग स्ट्रीटवर भटकणे, 1840 पासून स्कॉटलंडचे राष्ट्रीय पेय कसे बनवले जाते ते समजून घेण्यासाठी एडिनबर्गमधील माल्ट व्हिस्की डिस्टीलरीला भेट देणे, टोलेडो – ख्रिश्चन, मुस्लिम व ज्युइश अशा तीन संस्कृतींच्या नावाजलेल्या व सलोखापूर्ण मिलाफाचा अनुभव घेणे.


दरवर्षीप्रमाणेच, फॅमिली हॉलिडेसाठी जाणाऱ्यांमध्ये फार ईस्ट देशांमधील (सिंगापूर, मलेशिया, थायलंड, हाँगकाँग व मकाऊ) छोट्या ट्रिपची लोकप्रियता सर्वाधिक आहे, कारण ही ठिकाणे तुलनेने जवळ आहेत व थीम पार्क, सिटी टूर्स, केबल कार राइड यापासून निसर्गात भ्रमंती व सांस्कृतिक मेजवानी अशा वैविध्यपूर्ण पर्यायांद्वारे अप्रतिम अनुभव देणारी आहेत. सिंगापूर, मलेशिया व थायलंड येथील जमिनीवरील व क्रुजद्वारे केलेली सफर यंदा विशेष लोकप्रिय असून पर्यटकांना दोन्ही प्रवासांचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो. अधिकाधिक भारतीयांना जपान, चीन, कम्बोडिया, श्रीलंका व बाली अशा आशियायी देशांमध्ये फिरायला जाण्याची लोकप्रियताही वाढते आहे. 


भुतानमध्ये सायकलिंग मोहीम, अथेन्स ते मायकोनोस सेलिंग मोहीम आणि ऑस्ट्रेलियातील डेनट्री रेनफॉरेस्ट येथे ट्रेकिंग अशा थरारक ट्रिपसाठी साहसप्रेमी अतिशय उत्सुक आहेत. प्रामुख्याने युरोप, बाली, ग्रीस व भुतान येथे खरेदीची धमाल, सांस्कृतिक मोहीम, नेचर ट्रेल व कलिनरी ट्रेल असे अनुभव घेण्यासाठी महिला पर्यटकही उत्सुक आहेत. एकंदर, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याच्या सुटीतील हॉलिडेला असलेली मागणी अंदाजे 20% वाढली आहे. विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडणारी विमानसेवा वाढली असल्याने प्रवासाचा अप्रतिम अनुभव मिळत आहे. कॉक्स अँड किंग्स या ट्रॅव्हल कंपनीचा हा सर्वे आहे. ही सन 1758 पासूनची, जगातील एक सर्वात अनुभवी ट्रॅव्हल कंपनी आहे.