Covid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात नव्या ९६ हजार ५५१ झाली आहे. तर एक हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहोचली आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.
दिलासादायक बाब म्हणजे ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहून अधिक वेगात या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या आधिक आहे. सध्या देशात ९ लाख ४३ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू असून ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ लाख ४३ हजार ७७२ एवढा झाला आहे, यापैकी २लाख ४३ हजार ४४६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे २७ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातलं कोरोना मृत्यूचं प्रमाण २.९ टक्के एवढं आहे.