नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारताने ५३ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात प्रत्येक दिवशी जवळपास लाखाच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या १२४७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३,०८,०१५ इतकी झाली आहे. यापैकी १०,१३,९६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४२,०८,४३२ जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत. 
तर दुसरीकडे देशात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वेगानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ९५ हजार ८८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.


नितीन राऊत यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफही कोरोना पॉझिटिव्ह


 



महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होताना दिसत आहे. तसेच मुंबईतही कोरोना व्हायरसने उसळी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास दोन लाखांवर पोहोचली आहे.