नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे, तर ५० लाख १६  लाख ५२१ रुग्ण कोरोनाच्या विशख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत देशात नव्या ८२ हजार १७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या धोकादायक विषाणूने ९५ लाख ५४२ रुग्णांचा बळी घेतला असून सध्या ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 


तर सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या  महाराष्ट्रात आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३ लाख ३९ हजार २३२ इतकी झाली आहे. यात ३५ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १० लाख ३० हजार १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.