नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांवर पोहोचली आहे, तर  ६० लाख ७७ हजार ९७७ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७  इतकी झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत देशात नव्या ७४ हजार ९१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या धोकादायक विषाणूने  १ लाख ८ हजार ३३४ रुग्णांचा बळी घेतला असून सध्या ८ लाख ६७ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 


तर सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या  महाराष्ट्रात आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शनिवारी ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.