नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८१ हजार ४८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात एकूण ६३ लाख ९४ हजार ०६९ कोरोनाग्रस्त आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ९५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ९९ हजार ७७३ जणांचा बळी गेला आहे. ५३ लाख ५२ हजार ७८ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या देशभरात ९ लाख ४२ हजार २१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, पुन्हा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


देशात आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तसेच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे.


काल १ ऑक्टोबर रोजी देशात १० लाख ९७ हजार ९४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत देशभरात ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.