नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त अनेक एअरलाईन्स कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स सादर करतात. काही दिवसांपूर्वी एअर एशिया आणि विस्तारा या कंपन्यांनी तिकिटात काही प्रमाणात सवलत देण्याची ऑफर आणली. या ऑफरमध्ये कंपनी छोट्या शहरातील प्रवासात ग्राहकांना सवलत देणार आहे. ९९९ रुपयात छोट्या शहरात तुम्ही प्रवास करू शकता. २१ सप्टेंबर पासून प्रवासी मोठ्या शहरातून छोट्या शहरात प्रवास करू शकतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता इंडिगोतर्फेही नवी ऑफर देण्यात आली आहे. इंडिगोने २४ नॉन स्टॉप डेली फ्लाईटची सुरुवात केली आहे. या उड्डाणाची सुरुवात हैद्राबाद, चेन्नई, बंगळूर, मदुराई, नागपूर, तिरुपती या ठिकाणांवरून होईल. यासाठी कंपनीने ५० एटीआर एयरक्राफ्टची फ्लीट तयार केली आहे. 


इंडिगोच्या या ऑफरतर्फे शहरात तुम्ही ९९९ रुपयांमध्ये प्रवास करू शकता. कंपनीच्या वेबसाईटवर बुकींग देखील सुरु झाली आहे. याबद्दल इंडिगोचे प्रेसीडेंट आणि डिरेक्टर आदित्य घोष यांनी सांगितले की, "या ऑफरसोबत आम्ही लोकांना विमानातून प्रवास करण्याचा आनंद देऊ इच्छित होतो."


गेल्या काही दिवसात सरकारने स्वस्त दरात विमानप्रवास देण्यासाठी 'उडान' ही स्कीम सुरु केली होती. या स्कीममध्ये सहभागी होण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.