India’s First Airport to Connect 150 Destinations : भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे. हे विमानतळ सुमारे 5945 एकरवर बांधले आहे. तिरुचिरापल्ली येथे बांधलेले त्रिची विमानतळ हे भारतातील सर्वात लहान विमानतळ आहे.​ मुंबईचे  छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. देश विदेशात जाण्यासाठी मुंबईतून विमाने उड्डाण करतात. मात्र, भारतात एक असे विमानतळ आहे जिथून देश विदेशासह तब्बल 150 ठिकाणी जायला थेट विमान मिळते. जाणून घेऊया हे विमानतळ कोणते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वाधिक डेस्टिनेशलना जोडणारे हे विमानतळ देशाची राजधानी दिल्लीत आहे. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 150 ठिकाणी जायला थेट विमान मिळते. लांब पल्ल्याच्या परदेशी स्थळांवरून येणाऱ्या 88 टक्क्यांहून अधिक फ्लाइटचे गंतव्यस्थान दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे. भारतातून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या साप्ताहिक उड्डाणेंपैकी 56 टक्के विमाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ करतात. 50 टक्के लांब पल्ल्याचे प्रवाशासी भारताचा एन्ट्री पॉईंट म्हणून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच उतरतात. 


काही दिवसांपूर्वीच  पेन्ह, बाली डेन्पासर, कॅल्गरी, मॉन्ट्रियल, व्हँकुव्हर, वॉशिंग्टन ड्युलेस, शिकागो ओ'हारे, टोकियो हानेडासह अनेक देशांच्या कनेक्टीव्हीटीसाठी  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नव्या इंटरनॅशनल फ्लाईट सुरु करण्यात आल्या आहेत. दक्षिण आशियातील अग्रगण्य ट्रान्झिट हब म्हणून इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्षाला 40 लाख प्रवासी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करतात.