इंदिरा गांधी देशाच्या माता होत्या : वरूण गांधी
भाजपचे नेते आणि खासदरा वरूण गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या माता होत्या, असे म्हटले आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशतब्दी दिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत केलेल्या ट्विटमध्ये वरूण गांधी यांनी हे मत व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि खासदरा वरूण गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या माता होत्या, असे म्हटले आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशतब्दी दिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत केलेल्या ट्विटमध्ये वरूण गांधी यांनी हे मत व्यक्त केले आहे.
वरूण गांधी भाजप नेते
इंदिरा गांधी या वरूण गांधी यांच्या आजी आहेत. तर, वरूण गांधी हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून, ते सुलतानपूर येथून लोकसभेवर निवडून आले आहेत. वरूण गांधी यांच्या मतोश्री मनेका गांधी या सुद्धा भाजपच्या नेत्या असून, त्याही लोकसभेवर निवडून आल्या आहेत. तसेच, मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रीही आहेत.
आजी मला तुझी आठवण येते - वरूण गांधी
वरूण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सर्व गुणांमध्ये साहस सर्वश्रेष्ठ असते. कारण, साहस नसेल तर, तुम्ही तुमच्या दुसऱ्या कोणत्याच गुणात सातत्य ठेऊ शकत नाही. हे एका महिलेसाठी आहे. जी संपूर्ण देशाची आई होती. आजी मला तूझी खूप आठवण येते. मला माहित आहे की, तुझी माझ्यावर नेहमीच नजर असते.'
वरूण गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वरूण गांधी यांना कडेवर घेतलेले दिसत आहे.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917मध्ये अलाहाबाद येथे झाला. इंदिरा गांधी यांच्या जन्म शदाब्दीनिमित्त गांधी परिवारातील इतर सदस्य कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधई यांनी ही श्रद्धांजली अर्पण केली.
राहुल यांनीही केले ट्विट
दरम्यान, वरूण गांधी यांच्या ट्विटप्रमाणे राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करून इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राहुल गांधी यांनी म्हटल आहे की, 'आजी तू दिलेले प्रेम आनंदाने आठवतो आहे. तू माझी मार्गदर्श आहेस. तुझ्याकडून मला शक्ती मिळते.'