मुंबई : Ministry of Information and Broadcasting Twitter comprised: आताची एक मोठी बातमी. केंद्र सरकारच्या सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालायाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. या ट्विटर अकाऊंटचे नाव आणि प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर बुधवारी सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अअकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. मात्र, आता खाते पूर्ववत करण्यात आले आहे. दरम्यान, हॅकर्सने नाव आणि फोटो बदलला आहे. हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटचा फोटो आणि नाव बदलले होते. हॅकर्सनी प्रोफाईलवर एलोन मस्कच्या नावासह माशाचा प्रोफाईल फोटो अपलोट केला होता.



दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) माहिती देताना सांगितले की, आज (१२ जानेवारी) सकाळी मंत्रालयाच्या खात्यात छेडछाड झाली होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, 'ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आहे.'



गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींचे ट्विटर हॅक


डिसेंबर 2021मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर PM Narendra Modi Twitter Account) हॅक झाले होते आणि असे ट्विट करण्यात आले होते की भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र, त्यात तातडीने दुरुस्ती करण्यात आली.