मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पत्ते खेळायला येताता. काही लोक सुट्ट्यांमध्ये मजा म्हणून आपल्या मित्रांसोबत पत्त्यांनी खेळतात. तर काही लोक पैसे लावून पत्त्यांनी खेळतात. आपल्यापैकी असे ही काही लोक असतील ज्यांना पत्ते खेळता येत नाहीत, परंतु त्यांनी आयुष्यात एकदातरी पत्ते पाहिलेच असेल. परंतु तुम्ही खेळताना कधी या पत्त्यांना नीट पाहिलं आहे का? यामध्ये असलेल्या 4 राजांपैकी एक राजा म्हणजेच बदामचा राजा हा वेगळा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये सगळ्या राजांना मिश्या आहेत. परंतु बदामच्या राजालाच मिशा नाही. परंतु असं का? याचा तुम्ही कधी विचार केलाय? फार कमी लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली असावी.


परंतु असे का? केलं असावं यामागचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


खरेतर लाल राजा म्हणजे बदामच्या राज्याच्या मिशांबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत. त्यांपैकी एक म्हणजे, या राजाला सुरुवातीला मिशा होत्या परंतु हे कार्ड छापण्याच्यावेळी डिझानदरम्यान चूक घडली आणि आधीच खूप कार्ड्स छापलं गेलं असल्यामुळे नंतर हे डिझाईन बदललं गेलं नाही.


तसे, ही चूक न सुधारण्याचे एक कारण असेही मानले जाते की 'किंग ऑफ हार्ट' हे फ्रेंच राजा 'शार्लेमेन'चे चित्र आहे, जे दिसायला सुंदर आणि प्रसिद्ध होता. त्यामुळे वेगळे दिसण्याच्या इच्छेने त्याने मिशा काढल्या. त्यामुळेच या राजाला मिशा नव्हत्या किंग ऑफ हार्ट्सच्या नावावर एक हॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये राजाला मिशा नव्हत्या.


यावरील राज्यांची कहाणी काय?


King of Spades किंवा किल्वरचा राजा - डेव्हिड, जो इस्रायलच्या जुन्या काळातील राजा आहे. King of Clubs राजा म्हणजेच पक्ष्यांचा राजा, हा मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट आहे, ज्याने मोठा परिसर जिंकला होता.


King of Hearts किंवा इस्पिकचा राजा - यात फ्रान्सचा राजा शारलेमेनचा फोटो आहे, जो रोमन साम्राज्याचा पहिला राजा देखील होता. तो 747 ते 814 पर्यंत तो राजा होता.


King of Diamonds किंवा चौकट राजा - या पानावर ज्या राजाचा फोटो आहे तो रोमन राजा सीझर ऑगस्टस आहे. तर काही लोक असेही म्हणतात की, हा फोटो ज्युलियस सीझरचा आहे सीझर ऑगस्टसचा नाही.


King of  Heart किंवा बदाम राजा -  'किंग ऑफ हार्ट' हे फ्रेंच राजा 'शार्लेमेन'चे चित्र आहे, जे दिसायला सुंदर आणि प्रसिद्ध होता. त्यामुळे वेगळे दिसण्याच्या इच्छेने त्याने मिशा काढल्या होत्या.