चाईबासा : झारखंडच्या चाईबासा भागात माणुसकीला काळिमा फसणारी घटना घडलीय. इथं एका महिलेला कथित चोरीचा आरोप करत घोळक्यानंच कायदा हातात घेत आपला अमानवीय चेहरा जगासमोर उघड केलाय. या महिलेला जमावानं पहिल्यांदा बेदम मारहाण केली... इतक्यावरच त्यांचं मन भरलं नाही तर तिचं अर्ध डोकं भादरून.... तिच्या गळ्यात चपलांचा हार घालत तिला संपूर्ण गावात फिरवण्यात आलं... यावेळी तिच्या गळ्यात एक बोर्डही लटकावण्यात आला... या बोर्डवर या महिलेचं नाव लिहित ती चोर असल्याचं लिहिण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिला चाईबासाच्या तांबो चौकात राहते. गेल्या काही दिवसांपासून या भागात चोरीच्या घटना वाढल्याचा आरोप केला जातोय. चोरीच्या एका घटनेत एका महिलेसोबत आणखीन काही तरुणांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. याच संशयाच्या आधारावर जमावानं महिलेला बेदम मारहाण केलीय. 


पीडित महिलेनं, आपण चोरी केली नसल्याचं हरएक पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचं कुणीही ऐकलं नहाी. जमावानं महिलेला पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही तर स्वत:च कायदा हातात घेतला... आणि महिलेला मारहाण केली... तिला विद्रूप करत तिची गावभर धिंड काढण्यात आली. 


पोलिसांना मात्र या घटनेची माहिती ही बातमी सोशल मीडियावर आल्यानंतरच समजली. मात्र, अद्याप या घटनेवर पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.