CA Result : वडिलांच्या कष्टाच चीज! तरूणाकडून सर्वात कठीण परीक्षा पास
Inspiratinal Story : चूरुचा रहिवासी असलेल्या किशोर कुमारने सीएची परीक्षा (CA Result) पास केला आहे.किशोर हा एका कारपेंटरचा मुलगा आहे.या कारपेंटरच्या मुलाने बाबाच्या कष्टाचे चीज करत हे य़श मिळवले आहे.
Inspiratinal Story : तुमच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. अशी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका तरूणाने कठीण परिश्रम करून देशातील सर्वात कठीण मानली जाणारी सीए म्हणजेच चार्टड अकाऊंटची (Chartered Account Exam)परीक्षा पास केली आहे. त्याच्या या यशाने कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच गावामध्ये देखील त्याचे कौतुक केले जात आहे.
कारपेंटरच्या मुलाचे घवघवीत यश
चूरुचा रहिवासी असलेल्या किशोर कुमारने सीएची परीक्षा (CA Result) पास केला आहे.किशोर हा एका कारपेंटरचा मुलगा आहे.या कारपेंटरच्या मुलाने बाबाच्या कष्टाचे चीज करत हे य़श मिळवले आहे. त्याच्या या यशाचा कुटूंबिय आणि नातेवाईकांना खुप आनंद झाली आहे.सध्या संपुर्ण राज्यात किशोर कुमारची चर्चा आहे.
घरची परिस्थिती हलाखीची
किशोरची घरची परिस्थिती खुप अशी चांगली नव्हती. अत्यंत बिकट परिस्थितीत तो मोठा झाला आहे. किशोरचे वडिल 5 वी पास आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे. तसेच किशोरचा मोठा भाऊ वडिलांप्रमाणेच मजूर म्हणून काम करतो. आणि अशाप्रकारे त्याचा भाऊ आणि वडिल घर चालवतात. अशा बिकट परिस्थितीत त्याने ही परीक्षा पास (CA Result) करून यश संपादन केले.
5 वर्षापासून परीक्षेची तयारी
किशोर गेल्या साधारण 5 वर्षापासून सीएच्या परीक्षेची (CA Result) तयारी करत होता. या परीक्षेत कठीण परिश्रम केल्यानंतर आता कुठे त्याला य़श आले आहे. सीए ही देशातली सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश मिळवून त्याने कुटूंबियांचे नाव मोठे केले आहे. या यशावर किशोर म्हणाला की, त्याचा जास्त वेळ अभ्यासात जातो. त्याचा परिणाम आज सर्वांसमोर आला आहे.
दरम्यान मंगळवारी सीए परीक्षेचा (CA Result) निकाल लागला होता.या निकालामध्ये किशोर सीए झाल्याचं कुटुंबीयांना कळालं होते. त्यावेळेस कुटूंबियांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता किशोरचे अभिनंदन करण्यास मोठी झूंबड उडालीय. तसेच किशोरच्या या यशानंतर त्याच्या कुटूंबियांचे आणि शहराचे नाव मोठे झाले आहे.