Old Lady Jump In River: आजी नदीवरील पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; हा Video पाहून अनेकांना बसला धक्का
Video Old Woman In Sari Jumps In River: एका महिला आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला असून हा नेमका कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दलची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.
Video Old Woman In Sari Jumps In Tamirabarni River: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक साडी नेसलेल्या आजी (Old Woman In Sari) नदीवरील पुलावरुन नदीत उडी मारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उंच पुलावरुन नदीवर उडी मारताना आजींचा उत्साह एखाद्या 18 वर्षांच्या तरुणाला लाजवेल असा आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल.
कोणी शेअर केलाय व्हिडीओ आणि कुठे शूट करण्यात आलाय?
भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कार्यकरत असलेल्या आयएएस सुप्रिया शाहू यांनी या आजींचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये 'मंडे मोटिव्हेशन' हा हॅशटॅग वापरला आहे. "साडी नेसलेली वयस्कर महिला तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कल्लिदाइकुरिचीमधील ताम्रबरनी नदीमध्ये उडी मारताना दिसत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार ही महिला रोज अशाच प्रकारे आंघोळ करते. हे या महिलेसाठी रोजचं आहे. ती यामध्ये एकदम हुशार आहे. मात्र हे प्रेरणादायी आहे," असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे. आपल्याला हा व्हिडीओ एका मित्राने पाठवला आहे असंही सुप्रिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओत नेमकं काय दिसतं?
व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही 55 ते 60 वर्ष वयाची असून ताम्रबरनी नदीवरील पुलावरुन नदीत उडी मारताना दिसत आहे. साडी नेसलेली असतानाही अगदी उत्साहामध्ये ही महिला नदीत उडी मारताना दिसते. नदीतील पाण्याच्या पातळीपासून पूलाची उंची 40 फुट इतकी असल्याचं सांगितलं जातं. असं असतानाही या आजी अगदी आत्मविश्वासाने नदीत उडी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अन्य महिला नदीत पोहताना दिसत आहेत. या महिलांनी या आजींच्या आधी नदीमध्ये उड्या मारल्याचं सांगितलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या महिला रोज अशाच पद्धतीने नदीमध्ये आंघोळ करतात. अशा प्रकारे नदीमध्ये उड्या मारणं त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. तुम्हीच पाहा या महिलेचा व्हिडीओ...
कमेंट्सचा पाऊस
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना आजींची डेअरिंग पाहून धक्का बसला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रेरणादायक आजी असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. यांना पाहून असं वाटतंय की आपण ऑलिम्पिकमधील अनेक मेडल्स यांना न पाठवल्याने गमावलेत, अशी कमेंट एकाने आजींचं कौशल्य पाहून केलं आहे. अन्य एकाने ताम्रबरनी एक हिलींग रिव्हर आहे. ही नदी फार शुद्ध आणि प्रेक्षणीय आहे, मला अपेक्षा आहे की देशातील इतर मोठ्या नद्यांबरोबर झालं तसं प्रदुषणाच्याबाबतीत या नदीबरोबर होणार नाही, असं म्हटलंय.