Instagram Reels : प्रेमाचे अनेक व्हिडीओ (Video) आजकाल आपल्याला सोशल मीडियावर (Social media) पाहिला मिळतात. कपल गोल (Couple goals) या टॅगलाईन (Tagline) खाली रोज अनेक कपल आपल्या प्रेमाच्या (Love) भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात. प्रेम हे तरुणपणातच केलं पाहिजे असं काही नाही. वृद्ध काळातही प्रेम होऊ शकतं. प्रेम हे कधी कुठे कोणावर आणि कुठल्या वयात होतं याला काही मर्यादा नाही. सोशल मीडियावर आजोबा-आजीचे (grandma-grandpa) अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत. वृध्द वयात आजीने (grandmother) जे काही आजोबांची (grandfather) फिरकी घेतली आजोबा काय बघणारेही लाजून पाणी पाणी झाले आहेत. 


बाबौ! या आजीने तर कमालच केली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधं गावातील हे वृद्ध जोडप (old couple) सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घरातील दारासमोर बसलेलं हे जोडपं यांच्या चेहऱ्यावरील भाव इतके निरागस आहेत की, हा व्हिडीओ पाहून अनेक जण या जोडप्याच्या प्रेमात पडले आहेत. साध्या पांढऱ्या धोती -कुर्त्यातील म्हातारा जेव्हा म्हातारी असं काही करते की तो त्यानंतर अशी प्रतिक्रिया देतो की, नेटकरी वेडे झाले आहेत. म्हाताऱ्याचे ते निरागस भाव यूजर्सचं मनं जिंकून घेतं आहे. चला बघा मग नेमकं आजीबाई असं काय केलं ते....


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by @kethamma__avva


प्रेम असावं तर असं...


किती सहज आजीबाईने आपल्या म्हाताऱ्याला किस (kiss) केली ते...आणि त्यानंतर म्हातारा कसा लाजतो ते... खरंच प्रेम असावं तर असं...प्रेमाला ना वयाची आणि कुठल्याही गोष्टीची मर्यादा नसावी. ते फक्त फुलतं जावं. वृद्ध वयामध्ये एकमेकांवर भरपूर प्रेम करत जगण्याचा खऱ्याखुऱ्या आनंद कसा घ्यायचं हे कोणी या आजीआजोबांकडून शिकलं पाहिजे. धावपळीच्या जगात नोकरीच्या टेन्शनमध्ये अगदी सोशल मीडियावरील लाईनमध्ये खरं आयुष्यच जगणं विसरून जातो. तो क्षण जगणं विसरून जातो. त्या म्हातारीने गुपचूप आजोबांना केली किस आणि त्यानंतर आजोबांची प्रतिक्रिया हे जीवनाचं खरं सार आहे.