मुंबई : मांजर, कुत्रा किंवा गाय यांसारखे पाळीव प्राणी आपण आपल्या अवतीभवती पाहातो. परंतु आपण जेव्हा या प्राण्यांना अंधारात पाहातो, तेव्हा आपल्याला त्यांचे डोळे, काहीसे वेगळे दिसतात. अंधारात या प्राण्यांचे डोळे चमकू लागतात. पण हे खूपच आश्चर्यकारक आहे. कारण माणसांचे डोळे हे काळोखात असे चमकत नाहीत, मग या प्राण्यांचे डोळे कसे काय चमकतात? या मागे नेमकं काय कारण असू शकतं, तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला यामागचं मनोरंजक कारण सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही अहवालांनुसार, प्राण्यांचे डोळे मानवांपेक्षा बरेच वेगळे मानले जातात. प्राण्यांना निसर्गाचे वरदान मिळाले आहे की ते रात्रीच्या वेळी अंधारात किंवा कमी प्रकाशात सहज पाहू शकतात आणि त्यासाठी त्यांना अशा विशेष डोळ्यांची गरज असते जेणेकरून ते शिकार करू शकतील किंवा त्यांच्या शिकारींपासून सुटू शकतील.


रात्रीच्या अंधारात मांजरांचे डोळे चमकू लागतात. यामध्ये सिंह, वाघ, चित्ता या प्राण्यांचाही समावेश आहे.


आम्ही तुम्हाला सांगतो की, अंधारात माणसांपेक्षा प्राणी चांगले पाहतात. रात्रीच्या अंधारात मांजरांसोबत इतरही अनेक प्राणी असतात ज्यांच्या डोळ्यांची बाहुली खूप मोठी असते. जर काही अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल, तर तो मनुष्याच्या डोळ्यांच्या बाहुल्यांपेक्षा 50 टक्क्यांहून अधिक मोठा मानला जातो.


तसेच, मांजरींच्या डोळ्यातील प्रकाश-संवेदनशील पेशी मानवांपेक्षा खूप जास्त असतात, ज्याला रोड्स म्हणतात. त्यामुळे अंधारातही हे प्राणी माणसांपेक्षा चांगले दिसतात.


अंधारात प्राण्यांचे डोळे का चमकतात?
आज आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत. प्राण्यांच्या डोळ्यांच्या अतील पडदा मागे टेपेटम ल्युसिडम नावाची एक ऊतक असते. मानवी डोळ्यात या प्रकारचे ऊतक नसतात. म्हणून प्राण्यांचे डोळे चमकतात.


या प्रकारच्या ऊतींना प्रकाश मिळतो आणि तो सिग्नल बनवून मेंदूला पाठवायला लागतो. त्यामुळे अंधारातही या प्राण्यांना सगळं बरोबर दिसतं.


मांजरीचे टेपेडम हे ल्युसिडम टिश्यू क्रिस्टल्स सारख्या पेशींनी बनलेले असते. तो काचेसारखा प्रकाश परावर्तित करतो आणि रेटिनाकडे परत पाठवू लागतो. त्यामुळे प्राणी प्रत्येक चित्र स्पष्टपणे पाहू शकतात.


परंतु तुम्हाला माहितीय का, की सगळ्याच पाळीव प्राण्यांचे डोळे अंधारात चमकत नाहीत. तुम्ही जर नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, सगळ्या कुत्र्यांचे डोळे चमकत नाहीत.