भारतीय रेल्वे देणार विमानाचा अनुभव
आता, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता विमानांप्रमाणेच अधिक मनोरंजक होऊ शकतो.
नवी दिल्ली : आता, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता विमानांप्रमाणेच अधिक मनोरंजक होऊ शकतो.
ज्यांना रेल्वेच्या प्रवासात कंटाळा येतो, त्यांना आता नव्या व्हिडिओ सेवेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं रेल्वेनं पावलं उचलली असून यासाठीच्या निविदा मागवण्यात येणार आहेत.
सुमारे तीन हजार रेल्वेगाड्यांमध्ये अशा प्रकारची सुविधा देण्यात येणार आहे. इंट्रानेटच्या माध्यमातून वाय-फायवर साईन इन करून प्रवाशांना मोबाईलवर व्हिडिओ पाहता येतील. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी एक हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.