पुणे : मास्टर ब्लास्टर म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच एक मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी JetSynthesys मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकरने 14.8 कोटींची गुंतवणूक केली आहे. खेळाप्रमाणेच गुंतवणूकीतही सचिन मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. कंपनीलाही या गुंतवणूकीमुळे मजबुती मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन आणि JetSynthesys चे जुने नाते.
JetSynthesys ही पुण्याची कंपनी आहे. या कंपनीसोबत सचिनेचे जॉइंट वेंचर आहे. JetSynthesys आणि सचिन दोघांनी  मिळून क्रिकेटशी संबधीत डिजिटल प्लॅटफॉर्म 100MB नावाने सुरू केला आहे. यामध्ये इमर्सिव क्रिकेट गेम्सचा सामावेश आहे.


अनेक दिग्गज कंपनीचे स्टेहोल्डर्स
JetSynthesys हाय नेटवर्क प्ले सोबतच मोबाईल गेम्स डेवलप करणारी कंपनी आहे. याची ग्लोबल पार्टर्नरशिप WWE, Square Enix सारख्या आणखी अनेक कंपन्यांसोबत आहे.