मुंबई : अयोध्येत (Ayodhya) श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये नेपाळचे संतही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अयोधेतील राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी श्री राम मंदिरच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाग घेणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की, ही निमंत्रण  यादी वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह वरिष्ठ वकील के. परासरन आणि इतर मान्यवरांशी चर्चा करुन तयार करण्यात आली आहे.


मुख्य समारंभासाठी निमंत्रित केलेल्या १७५ मान्यवर अतिथींपैकी १३५ हे साधू आहेत, जे विविध आध्यात्मिक परंपरांशी संबंधित आहेत आणि ते सर्व उपस्थित असतील. याशिवाय शहरातील काही मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच नेपाळच्या संतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. कारण जनकपूरचे बिहार, उत्तर प्रदेश आणि अयोध्याशीही संबंध आहेत.



उत्तर प्रदेश राज्य सरकार मंदिराच्या रचनेवर आधारित टपाल तिकीटही जारी करेल. चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कॅम्पसमध्ये 'पारिजात'चे रोप लावतील. याशिवाय काही कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कोठारी बंधूंची बहीण पूर्णिमा कोठारी यांनाही आमंत्रित केले आहे.


विशेष म्हणजे बाबरी मशिदीच्या पार्टी इक्बाल अन्सारी यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. भूमिपूजनमध्ये अशोक सिंहल कुटुंबातील महेश भागचंदका आणि पवन सिंघल हे मुख्य न्यायाधीश असतील. आचार्यांच्या सूचनेनुसार मुख्य यजमान पूजेच्या सर्व पद्धती पूर्ण करतात.


लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी श्री राम मंदिरच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाग घेणार नाहीत. त्याचे वय झाल्याने अडवाणी-जोशी यांना बोलावण्यात आले नाही. कारण ते येण्याची स्थितीत नाहीत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंगदेखील भूमिपूजनात भाग घेणार नाहीत, वृद्धत्वामुळे ते भाग घेणार नाहीत, अशी माहिती  चंपत राय यांनी दिली.