नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दिल्ली उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी सीबीआयचे पथक घरी गेले. मात्र, ते घरी नसल्याने रिकाम्या हाती माघारी परतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम घरी नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे सीबीआयच्या पथकाला त्यांना अटक करता आले नाही.



चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तात्काळ चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.