नवी दिल्ली  : INX मीडिया गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालायनं जामीन मंजूर केलाय. त्यांनी सीबीआयनं 28 फेब्रुवारी रोजी दिल्ली विमानतळावर अटक केली होती.आज कार्ती यांच्या 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. न्यायमूर्ती एस.पी. गर्ग यांनी चिदंबरम यांना 10 लाख रुपयांचा चातमुचलका भरण्याचे आदेश दिलेत. तसेच त्यांना देशाबाहेर जायचं असेल, तर सीबीआयची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्ती यांचा पासपोर्ट सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. जामीनावर बाहेर असताना कार्ती यांनी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये, असंही न्यायालायनं बजावलंय. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी केंद्रात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते आणि चिदंबरम केंद्रात अर्थमंत्री होते. या परवानग्या मिळवून देण्याच्या मोबदल्यात कार्ती यांनी लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात माझ्या मुलाला झालेली अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे असे पी. चिदंबरम यांनी आधीच म्हटले आहे.



मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कार्ती चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. सीबीआयने कार्ती विरोधात दाखल केलेले प्रकरण रद्द करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे कार्ती यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेय.