Indian oil Pertrol Pump : तुम्ही नवीन बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर पेट्रोल पंपच्या डिलरशिप ऑफरसंबंधी कोणता मेसेज किंवा फोन कॉल आला असेल तर वेळीच सावध व्हा. कदाचित तुम्हाला भविष्यातही असा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो. भारत सरकारच्या इंडियन ऑईल (Indian oil) कंपनीने यासंबंधी खुलासा केला.


इंडियन ऑईलने केलंय सतर्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इंडियन ऑईल कंपनीने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अलर्ट जारी केला आहे. काही फसव्या वेबसाईटकडून इंडियन ऑईल कंपनीच्या नावाचा वापर करून पेट्रोल पंपच्या डिलरशिप ऑफर केली जातीये. असे डिलरशिप ऑफरसंबंधी मेसेज किंवा फोन कॉल्स आले असतील तर वेळीच सावध व्हा.


जवळच्या ऑफिसशी संपर्क साधा



इंडियन ऑईलने ट्वीट करून सांगितलं की, या संबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही पीएसयू तेल कंपनींच्या जवळच्या ऑफिसशी संपर्क करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपाच्या डिलरशी संपर्क करू शकता.