Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदी ऑक्सीजन सपोर्टवर, सुश्मिता सेनच्या भावाने केली अशी कमेंट
Lalit Modi on Oxygen Support: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lali Modi) ऑक्सीजन सपोर्टवर आहेत, गेल्या काही दिवसात अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबरच्या (Sushmita Sen) रिलेशनशिपमुळे ते चर्चेत होते
Rajeev Sen react on Lalit Modi Hospital Photos: आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी (Lali Modi) गेल्या वर्षी एका लव अफेअर चांगलेच चर्चेत आले होते. मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत असल्याची माहिती त्यांनी इन्स्ट्राग्रामवर दिली होती. काही दिवसांनंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. आता पुन्हा एकदा ललित मोदी चर्चेत आले आहेत. त्यांना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर सुश्मिता सेनच्या (Sushmita Sen) भावाने कमेंटे केली आहे.
ऑक्सीजन सपोर्टवर आहेत Lalit Modi
गेल्या काही दिवसांपासून ललित मोदी यांची प्रकृती गेल्या खालावली आहे. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. ललित मोदींनी स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ललित मोदी यांना दोन आठवड्यात दोन वेळा कोरोनाची (Covid19) लागण झाली. इन्फ्लूएंझा (Influenza) आणि न्यूमोनियाही (Pneumonia) झाला होता. आपण 24 ऑक्सीजन सपोर्टवर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
सुश्मिता सेनाच्या भावाची कमेंट
ललित मोदी यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. ललित मोदी यांची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) यानेही कमेंट केली आहे. राजीव सेनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, तुम्ही लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो, खंबीर राहा (Wishing you a speedy recovery Lalit. Stay strong). दरम्यान सुष्मिता सेनने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ललित मोदींनी केली आयपीएलची सुरुवात
ललित मोदी हे 2005 ते 2012 पर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. ललित मोदी यांच्या पुढाकाराने आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली. दोन वर्ष ते आयपीएलचे अध्यक्ष होते. 2010 मध्ये त्यांच्यावर हेराफेरीचे आरोप झाले, त्यानंतर त्यांना आयपीएल अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. याच प्रकरणात ते देश सोडून फरार झाले आणि लंडनला स्थायिक झाले.
सुश्मिता सेनबरोबरच्या नात्याने पुन्हा चर्चेत
गेल्या वर्षी ललित मोदी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले. 14 जुलै 2022 ला त्यांनी इंन्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकत सुष्मिता सेनेबरोबरच्या नात्याचा खुलासा केला. या दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. पण सुष्मिता सेनने मात्र या नात्याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांनी ललित मोदी यांनी त्यांच्या प्रोफाईलमधून सुष्मिता सेनचं नाव काढून टाकलं होतं.