नवी दिल्ली : आयपीयो मार्केटसाठी 2021 वर्ष ब्लॉकबस्टर राहिले आहे. या वर्षी बहुतांश आयपीओ सुपर हीट राहिले आहे. आयपीओ मार्केट आता नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे. 1 जानेवारी पासून आतापर्यंत 36 आयपीओ बाजारात लिस्ट झाले आहेत. या आयपीओच्या माध्यमातून 60 हजार कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. याआधी 2017 मध्ये आयपीओ मार्केटमधून कंपन्यांनी 73500 कोटी उभारले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाचे अजूनही 3 महिने बाकी आहेत. अनेक कंपन्यांचे आयपीओ लॉंच होणार आहेत. 2021 मध्ये आयपीओ मार्केट नवीन रेकॉर्डच्या तयारीत आहे. विशेष बाब ही आहे की, 36 पैकी 30 आयपीओंचे रिटर्न पॉझिटिव्ह राहिले आहेत. गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाला आहे.


36 IPO अन् 60 हजार कोटींची उभारणी
यावर्षी आतापर्यंत 36 कंपन्यांनी आयपीओ मार्केटमधून 60 हजार कोटी रुपये उभारले आहेत. यावर्षी 36 पैकी 30 कंपन्यांचा पॉझिटिव्ह रिटर्न मिळाला आहे. फक्त 6 कंपन्यांचे लिस्ट झालेले शेअरचे निगेटिव्ह रिटर्न राहिले आहेत. म्हणजेच 83 टक्के आयपीओ चांगला रिटर्न देण्यात यशस्वी राहिले आहेत. यामधील काही स्टॉक तर याच वर्षी मल्टीबॅगर राहिले आहेत.


लिस्टिंग नंतर सर्वात जास्त रिटर्न देणारे स्टॉक 


Nureca Limited:  298.76%


Laxmi Organic Industries: 184%


Easy Trip Planners: 148%


Barbeque Nation Hospitality: 126%


MTAR Technologies: 119%


Stove Kraft Limited: 105%


Tatva Chintan Pharma Chem: 104%


GR Infraprojects: 92%


निगेटिव्ह रिटर्न स्टॉक
IRFC: -9.81%


Brookfield India Real Estate: -6%