रामपूर : मुलगी पळून गेली आणि आई-वडील तक्रार करायला आले; तर त्यांना तुरुंगात टाकेन, असं विधान करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामपूरचे पोलीस अधिक्षक अशोक कुमार शुक्ला यांचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक कुमार शुक्ला यांच्या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली. अखेर या प्रकरणी त्यांना माफी मागावी लागली. त्यांनी आपल्या विधानाचं खंडनही केलं. 


रामपूर इथे पोटनिवडणूक झाल्यानंतर अशोक कुमार शुक्ला तिथे उपस्थित होते. त्यांनी अक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचा व्हिडीओ समाजवादी पार्टीने आपल्या ट्वीटरवर शेअर केला. 


रामपुर में उपचुनाव होने के बाद पुलिस लाइन में एक सद्भावना गोष्ठी का आयोजन किया गया था, जिसमें एसपी अशोक कुमार शुक्ला के अलावा कई लोग मौजूद थे. इसी दौरान एसपी ने मंच संभाला और बच्चों की तालीम पर जोर देने की बात कही.



काय म्हणाले पोलीस अधीक्षक 'पोलीस लाईनमध्ये आत्ताच मोठी घटना समोर आळी, हिंदू मुलासोबत मुस्लिम मुलगी होती... किंवा हिंदू मुलगी मुस्लिम मुलासोबत पळून जाते मग बघा तुमच्या कुटुंबात असं का होतंय? माझी मुलगी गेली अशी तक्रार घेऊन आलेल्या पालकांना मी तुरुंगात पाठवेन'



ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर भागात घडली आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर तापल्यानंतर IPS अधिकाऱ्यांनी आपल्या विधानाचं खंडन केलं असून ट्वीट करत माफी मागितली आहे.