पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन
Spg Chief Arun Kumar Sinha Passes Away: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (SPG) प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दोन दिवसांपूर्वी यकृताच्या समस्येमुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Spg Chief Arun Kumar Sinha Passes Away: देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा (Arun Kumar Sinha) यांचे बुधवारी निधन झाले आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण कुमार सिन्हा हे 1987 बॅचचे आयपीसी अधिकारी होते. सिन्हा यांना निवृत्तीच्या एक दिवस आधीच एक वर्षांसाठी सेवावाढ मिळाली होती. (Arun Kumar Sinha Passes Away)
अरुण कुमार सिन्हा हे 2016पासून एसपीजी चीफ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षीच त्यांना संचालक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे आहे. अरुण कुमार सिन्हा, 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष सेवा आणि वाहतूक) होते.
सीमा सुरक्षा दलातील कार्यकाळ वगळता अरुण सिन्हा यांचा सरकारी सेवेतील बहुंताश कार्यकाळ हा राज्यातच होता. सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) कार्यकाळात त्यांनी अफाट धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. अरुण सिन्हा, ज्यांना सुरक्षा प्रोटोकॉल आणि कायद्याच्या गुंतागुंतीची सखोल माहिती होती. त्यांनी देशभरातील विविध पोलिस दलांमधून निवडलेल्या सुमारे 3,000 च्या क्रॅक कमांडो टीमचे नेतृत्व केले होते.
अरुण सिन्हा यांना यकृताच्या समस्येमुळं 4 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. झारखंडमधील हजारीबाग हे सिन्हा यांचे मुळं गाव होते. 61 वर्षीय अरुण सिन्हा यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
अनेक पदांनी गौरवण्यात आले होते
आपल्या कारकिर्दीत अरुण सिन्हा यांनी अनेक गंभीर प्रकरणांचा सामना केला होता. त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना ईमेलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या आणि लेटर बॉम्बच्या प्रकरणाचा उलगडला होता. याशिवाय सिन्हा यांनी राज्यात क्राइम स्टॉपर यंत्रणेचा पाया रचला होता. त्यांच्या या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना अनेक पदके आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.