मुंबई : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता ट्रेनचं तिकीट रद्द केल्यानंतर तुमचे पैसे अडकणार नाहीत तर लवकर रिफंड मिळणार आहेत. याशिवाय तिकीट बुकिंगसाठी लागणारा वेळही कमी करण्यात आला आहे. आयआरसीटीसीने आता स्वत:चं पेमेंट अॅप लाँच केलं आहे. त्याद्वारे पेमेंट केलं तर लवकर तिकीट बुक होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे तिकीट बुकिंग कसं करायचं? जर तुमचं तिकीट रद्द झालं तर तुम्हाला तत्काळ तिकीटाचे पैसे कसे मिळणार याबद्दल जाणून घेऊया. आयआरसीटीसीने ही सेवा ग्राहकांची गरज ओळखून आणली आहे. याने तुम्हाला काय फायदा होणार पाहूया. 


तिकीट बुकिंग प्रक्रिया


1. iPay द्वारे बुकिंगसाठी www.irctc.co.in वर लॉग इन करा.
2. आता प्रवासाशी संबंधित तपशील प्रवासाची तारीख, ठिकाण, कोच तुम्हाला पाहिजे ते सगळं भरा.
3. यानंतर तुम्हाला ज्या ट्रेननं प्रवास करायचा आहे ती ट्रेन निवडा.
4. तिकीट बुक करताना, तुम्हाला पेमेंट पद्धतीमध्ये 'IRCTC iPay' चा पहिला पर्याय मिळेल.
5. हा पर्याय निवडा आणि 'पे अँड बुक' वर क्लिक करा.
6. आता पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI तपशील भरा.
7. यानंतर तुमचे तिकीट तत्काळ बुक होईल, ज्याचे कन्फर्मेशन तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळेल.


मिळवा तात्काळ रिफंड


पूर्वी तिकीट रद्द केल्यावर पैसे परत मिळण्यासाठी बराच वेळ लागायचा. मात्र आता हे पैसे लगेच खात्यात जाणार आहेत. IRCTC अंतर्गत, ग्राहकाला त्याच्या UPI बँक खात्यासाठी किंवा डेबिटसाठी फक्त एक मेनडेट द्यावी लागेल. त्यामुळे पैसे पे करणं सोयीचं होईल आणि जास्त काळही लागणार नाही. 


झटपट बुक करता येणार तिकीट


IRCTC अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आधी कंपनीकडे स्वतःचा पेमेंट पर्याय नव्हता. त्यामुळे नेट बँकिंग किंवा इतर पेमेंट सुविधांचा आधार घ्यावा लागत होता. दुसरा पेमेंट गेटवे (IRCTC iPay ) वापरावा लागला. त्यामुळे बुकिंगला बराच वेळ लागला. 


जर पैसे कापले गेले तर खात्यात परत यायलाही जास्त वेळ लागायचा. पण आता ते होणार नाही. आता आयआरसीटीसी पेमेंट पर्याय अत्यंत सुरक्षित आहे. तिथे तुमचं तिकीट रद्द झाल्यावरही लवकरच रिफंड देखील मिळणार आहे. 


वेटिंग तिकीट रद्द झालं तर...


तुम्ही घाईगडबडीत तिकीट बुक करताना ऑनलाईन तिकीटात वेटिंग तिकीटही बुक करता. ते कन्फर्म होईल अशी अशा असते. मात्र काहीवेळा चार्ट लागतो पण तिकीट काही कन्फर्म होत नाही. अशावेळी ते तिकीट रद्द होतं. तुमचं तिकीट जर रद्द झालं तर तुम्हाला लगेच रिफंड मिळणार आहे.