नवी दिल्ली : घरबसल्या अतिरिक्त कमाई करण्याची आजकाल अनेकांची इच्छा असते. परंतु नक्की काय करावे याबाबत त्यांना योग्य माहिती मिळत नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍंड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC)तुम्हाला चांगली  संधी देत आहे. या माध्यमातून तुम्हाला IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन एजंट बनन्यासाठी अप्लाय करावे लागेल. यासाठी घरबसल्या तुम्ही हजारो रुपये कमाऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेलतर्फे जारी डेटानुसार 55 टक्के लोक आता ऑनलाईन माध्यमातून टिकिट बुक करतात. अशातच IRCTCच्या अंतर्गत ऑथराइज्ड टिकिट बुकिंग एजंट म्हणून काम केल्यास घरबसल्या तुम्ही मोठी कमाई करू शकता. एजंट सर्व प्रकारचे टिकिट बुक करू शकतो. एक टिकिट बुक केल्याने एजंटला चांगले कमिशन मिळते.


किती मिळते कमिशन
एका एजंटने नॉन एसी कोचचे टिकिट बुक केले तर IRCTC त्याला 20 रुपये प्रति टिकिट आणि एसी क्लास टिकिट बुक केले तर प्रत्येक टिकिटमागे 40 रुपयांपर्यंत कमिशन देते. त्याशिवाय टिकिट भाड्यात 1 टक्के एजंटला मिळतात. तसेच एजंटला टिकिट बुक करण्याची कोणतीही सिमा नसते. एजट महिनाभरात कितीही टिकिट बुक करू शकतो


काय सुविधा मिळतील


  • अनलिमिटेड टिकिट बुकिंग

  • बल्कमध्ये टिकिट बुक करणे

  • 15 मिनिटात तत्काल टिकिट बुक करण्याचा पर्याय

  • सोपी कॅन्सेलेशन पॉलिसी

  • रेल्वे, विमान, बस हॉटेल, फॉरेक्स, ह़लिडेज, प्रीपेड रिचार्जची सुविधा

  • ऑनलाईन अकाउंटवरून डोमॅस्टीक तसेच आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे टिकिट बुक करण्याची सुविधा


एजंट बनन्यासाठी किती चार्ज द्यावा लागेल


  • 1 वर्षाच्या एजंसीसाठी 3999 रुपये

  • 2 वर्षाच्या एजंसीसाठी 6999 रुपये


IRCTC एजंट कसे बनायचे
एक ऑनलाईन फॉर्म भरा आणि त्याला सबमिट करा. IRCTCला सही केलेला अर्ज आणि डिक्लेरेशन फॉर्म स्कॅन करून पाठवा. IRCTC तुमचे डॉक्युमेंट वेरिफाई करेल.
IRCTC ID बनवण्यासाठी 1180 रुपये भरावे लागतील. OTP आणि व्हिडिओ वेरिफिकेशन नंतर डिजिटल सर्टफिकेट बनेल. डिजिटल सर्टफिकेट मिळाल्यानंतर IRCTCची फी भरावी लागेल.  फी मिळाल्यानंतर तुम्हाला IRCTC क्रेडेंशिअल मिळेल.


या डॉक्युमेंट्सची असेल गरज


  • PAN कार्ड

  • आधार कार्ड

  • मोबाईल नंबर

  • वॅलिड ई-मेल आयडी

  • फोटो

  • एड्रेस प्रुफ

  • डिक्लेरेशन फॉर्म आणि ऍप्लिकेशन फॉर्म