आता रेल्वे प्रवासात जास्तीचे सामान नेल्यास लागणार दंड ! पाहा किती किलोला सवलत
IRCTC Latest Update: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आता रेल्वेतून प्रवास करताना कमीत कमी सामान न्यावे लागणार आहे. (IRCTC Luggage Rules)
मुंबई : IRCTC Latest Update: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आता रेल्वेतून प्रवास करताना कमीत कमी सामान न्यावे लागणार आहे. (IRCTC Luggage Rules) जर तुम्ही प्रवास करताना जास्तीचे सामान बरोबर घेतल्यास किंवा नेल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. कारण गरजेपेक्षा जास्त सामान प्रवासात नेल्यास रेल्वे प्रशासन दंड ठोठावण्याच्या विचारात आहे.
बरेचदा अनेक प्रवासी रेल्वेत गरजेपेक्षा जास्त सामान किंवा साहित्य घेऊन प्रवास करतात. त्यामुळे इतर प्रवाशांना बसायला अडचण होते. त्यामुळे जास्त सामान दिसल्यास प्रशासन रेल्वेच्या पार्सल कार्यालयात सामानाची मोजणी करण्यात येईल. गरजेपेक्षा जास्त सामान आढळल्यास दंड ठोठावण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रवासात जास्त सामान प्रवाशांने घेतले असले आणि रेल्वेने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त माल असेल तर त्याला दंड द्यावा लागणार. तसेच मालाची ने-आण करण्यासाठी रेल्वेच्या पार्सल कार्यालयात सामानाची नोंदणी करावी लागेल. त्यामुळे प्रवाशांनी गांभीर्य ओळखून सामानाच्या मर्यादेचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
प्रवासी किती किलो सामना सोबत घेऊ शकतो?
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 किलो वजनाच्या सामानासह प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करु शकतो. स्लीपर क्लासमधील प्रवासी 80 किलोचे सामान घेऊन जात असेल, तर याचा अर्थ तो 40 किलो जास्त सामान घेऊन जात आहे.
प्रवासी जर 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करणार असेल, तर त्याला 109 रुपये दंड भरावा लागेल. स्लीपर क्लाससाठी रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन वेगळे ठरविण्यात आले आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त मर्यादेच्या सामानाची वाहतूक करणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. यात 70 किलो फर्स्ट क्लास एसीसाठी ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवासी 40 ते 70 किलो सामान घेऊन जाऊ शकतो. फर्स्ट क्लास एसीबद्दल बोलायचे झाले तर त्यात 70 किलोपर्यंत सवलत प्रवाशांना देण्यात आली आहे.
S. No. | Class | Free Allowance | Marginal Allowance | Maximum quantity permitted (including free allowance) |
1. | AC First Class | 70 kg | 15 kg | 150 kg |
2. | AC 2-Tier sleeper/First class | 50 kg | 10 kg | 100 kg |
3. | AC 3-tier sleeper/AC chair car | 40 kg | 10 kg | 40 kg |
4. | Sleeper class | 40 kg | 10 kg | 80 kg |
5. | Second class | 35 kg | 10 kg | 70 kg |
दरम्यान, रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांच्या समानावर नियंत्रण येणार आहे. दंडाच्या भीतीमुळे प्रवाशांना जास्त सामान नेताना काळजी घ्यावी लागणार आहे. परंतु यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.
प्रवासात या वस्तू नेता येणार नाहीत
रेल्वे प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ, रॉकेल, गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ॲसिड, दुर्गंधीयुक्त वस्तू, चामडे, वंगण, पॅकेजमध्ये आणलेले तूप ज्यामुळे इतर प्रवाशांचे नुकसान होऊ शकते अशा वस्तू रेल्वेतून नेण्यास मनाई आहे. तसेच अशा वस्तू स्वत:सोबत बाळगल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.