मुंबई : आयआरसीटीसी तिकिट बुकिंग अधिक महाग होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड पडणार आहे.  रेल्वेने तिकिटांवरील सेवा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेचा तुमचा प्रवास थोडा महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई रेल्वे आरक्षण महाग होण्याची शक्यता आहे. जवळपास २० ते ४० रुपयांनी ही वाढ होणार आहे. ई रेल्वे आरक्षणाचा प्रवाशांना खूपच फायदा होतो. प्रवाशांच्या दृष्टीने अशा पध्दतीचे आरक्षण काढणे सोयीचे पडते. नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना चालना मिळावी म्हणून अशा आरक्षणावर सेवाशुल्क माफ करण्यात आले होते. आता मात्र हा निर्णय मागे घेण्याचं ठरवण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या निर्णयामुळे आता यापुढे ई तिकिट रेल्वे आरक्षण करताना २० ते ४० रुपये सेवाशुल्क भरावे लागणार आहे. यात स्लीपरसाठी २० रुपये सेवा शुल्क असेल तर एसी डब्यांमधील आरक्षणासाठी ४० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच रेल्वे प्रशासनाची बैठक घेऊन सेवा शुल्क दराबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 


पुन्हा ई-तिकिट बुकिंगवर सेवा शुल्क


आयआरसीटीसी तिकिट बुकिंग अधिक महाग होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. त्यामुळे रेल्वेचा तुमचा प्रवास थोडा महाग होण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसीमार्फत रेल्वेचे तिकिट बुक करणे महाग होईल. पुन्हा एकदा रेल्वेच्या तिकिट बुकिंगवर सेवा शुल्क लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हा निर्णय रेल्वे मंत्रालयावर सोडण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसी पुन्हा ई-तिकिट बुकिंगवर सेवा शुल्क आकारण्यास तयारी करत आहे. स्लीपर क्लासच्या ई-तिकिट बुकिंगवर २० रुपये आणि एसी वर्गाच्या ई-तिकिट बुकिंगवर ४० रुपये सेवा शुल्क आकारले जाईल.


वित्त मंत्रालयाची शिफारस


वित्त मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून ई-तिकिट बुकिंगवर सेवा शुल्क आकारण्यास सांगितले आहे, असे सूत्रांनी 'झी बिझनेस' ऑनलाईनला सांगितले, कारण मंत्रालयाने भारतीय रेल्वेला ८८ कोटी रुपयांचा निधी देण्यास नकार दिला आहे, जो भरपाई म्हणून ही रक्कम मिळत होती. यामुळेच आयआरसीटीसीला ई-तिकिट बुकिंगवर सेवा शुल्क आकारण्यास सांगण्यात आले आहे.