IRCTC Tour | 31 डिसेंबरचा आनंद घ्या उटी आणि म्हैसूरच्या रोमॅंटिक वातावरणात; जाणून घ्या पॅकेज
जर तुम्ही या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर दक्षिण भारत हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुमच्या सोयीसाठी, IRCTC ने एक उत्तम पॅकेज आणले आहे.
मुंबई : IRCTC टूर पॅकेज: हिवाळा देखील पर्यटनासाठी सर्वोत्तम हंगाम मानला जातो. या दिवसात तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात फिरून पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठेतरी फिरण्याचा विचार करीत असाल तर दक्षिण भारत हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुमच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेची पर्यटन कंपनी IRCTC ने एक उत्तम पॅकेज आणले आहे.
IRCTC पॅकेज म्हैसूर, उटी आणि कुन्नूर
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने तुमच्यासाठी स्वस्त आणि आलिशान टूर पॅकेजेस आणले आहेत. या अंतर्गत तुम्ही म्हैसूर, उटी आणि कुन्नूरला भेट देऊ शकता. या टूर पॅकेजचे नाव आहे दक्षिण प्रवास – म्हैसूर उटी आणि कुन्नर. हे संपूर्ण टूर पॅकेज 4 रात्र आणि 5 दिवसांचे आहे. याअंतर्गत प्रवाशांना उटी, म्हैसूर आणि कुन्नूरचे नैसर्गिक सौंदर्य पाहता येणार आहे.
या पॅकेजचा प्रवास मोड - AC
प्रवासाची तारीख - 29.12.2021 ते 02.01.2021
वर्ग- डिलक्स
आयआरसीटीसीचे ट्विट
IRCTC ने ट्विट करून या संपूर्ण पॅकेजची माहिती दिली आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन या पॅकेजबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. यासोबतच 9002040020 आणि 9002040126 या क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवता येईल.
या टूर अंतर्गत म्हैसूरमध्ये 2 रात्री, उटी येथे 2 रात्री राहण्याची सोय आहे. या दरम्यान तुम्हाला दोन्ही ठिकाणी डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जात आहे. याशिवाय 12 आसनी टेम्पो ट्रॅव्हलरही पर्यटनासाठी उपलब्ध असतील.
प्रति व्यक्ती किती खर्च येईल?
सिंगल - 32,880
डबल - 26,070
ट्रिपल - 25,460