IRCTC Tour Package: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आपल्या प्रवाशांसाठी एक खास पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून परदेश प्रवास करता येणार आहे. या पॅकेजच्या मदतीने प्रवाशांना आशियातील सर्वात सुंदर देशांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजमधून प्रवाशांना थायलंडला जाता येणार आहे. येथे प्रवाशांना समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटता येणार आहे. तुम्हालाही ऑगस्ट महिन्यात बँकॉक आणि पट्टायाला जायचे असेल तर या पॅकेजशी संबंधित सर्व तपशील जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर माहिती


आयआरसीटीसीने या पॅकेजशी संबंधित सर्व खास गोष्टी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे यूजर्सपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयआरसीटीसीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला थायलंडचा आनंद घ्यायचा असेल आणि थाई मसाज आणि समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर या पॅकेजचा लाभ घ्या. 11 ऑगस्टला या प्रवासाला सुरुवात होईल आणि 16 ऑगस्टला परतीचा प्रवास सुरु होईल.



किती खर्च येईल?


  • या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 53,781 रुपये मोजावे लागतील.

  • दोन जण असाल तर प्रति व्यक्ती 47,775 रुपये द्यावे लागतील.

  • तीन लोकांना प्रति व्यक्ती 47,775 रुपये शुल्क भरावे लागेल.

  • मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह 46,032 रुपये मोजावे लागतील.



पॅकेजमधील तपशील जाणून घ्या


या पॅकेजचे नाव थायलंड डिलाइट्स एक्स इम्फाल आहे. या पॅकेजचा कालावधी 5 रात्री आणि 6 दिवस आहे. येथे प्रवाशांचा प्रवास विमानाने होणार आहे. इम्फाळ-कोलकाता-बँकॉक-पट्टाया-बँकॉक-कोलकाता हे गंतव्यस्थान आहे.


आणखी काही विशेष सुविधा


या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला राहण्यासाठी हॉटेलची सुविधा दिली जाईल. त्याच वेळी, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा देखील पॅकेजमध्ये आहे. सर्व ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी स्थानिक गाईडची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळणार आहे.