IRCTCची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करण्यास अडचणी
IRCTC Down: रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी भारतातील नागरिक IRCTCवरुन ऑनलाइन बुकिंग करतात. मात्र, आता प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
IRCTC Down: भारतीय रेल्वेचे तिकिट बुकिंग IRCTC ची साइट ठप्प पडली आहे. IRCTCच्या बेवसाइटची सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळं तिकिट बुक करण्यात समस्या येत आहे, असं आयआरसीटीसीने ट्विट करत म्हटलं आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल. त्यानंतर सेवा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे, असं कंपनीच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आयआरसीटी वेबसाइट सतत ठप्प होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. अनेकांनी ट्विटरवरुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रवाशांना तिकिट बुक करण्यास अडचणी येत आहेत. तर, आयआरसीटीसीकडून लवकरच वेबसाइट सुरु करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारण शोधण्याचे काम टीम कडून करण्यात येत आहे, असं सांगण्यात येत आहे.
आयआरसीटीसीची वेबसाइट पुन्हा कधी पुर्ववत होईल हे मात्र अद्याप सांगण्यात आले नाहीये. देशातील अनेक भागातील लोकांना ही समस्या येत आहे. एका युजर्सने दिलेल्या कमेंटमध्ये त्याने म्हटलं आहे की, तात्काळ तिकिटांसाठी हा इश्यू सकाळी 10 वाजल्यापासून सुरू आहे. पेमेंट करण्यास अडचणी येत आहे. पेमेंट केल्यानंतरही पैसे कट केले जातात. आयआरसीटीसीचे पेज रिडायरेक्टवर एरर येत होते. 10 वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या साइटवर हा इश्यू येत होता. मात्र इतक्या उशीराने याबाबत माहिती का देण्यात आली, असा सवाल एका युजरने उपस्थित केला आहे.